Uday Samant on Nashik Tree Cutting: माझ्या बोलण्याचा कोणाला राग येईल, पण माझी...; तपोवनातील वृक्षतोडीबाबत उद्योगमंत्र्यांचं परखड मत
Uday Samant on Nashik Tree Cutting: नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीच्या वादावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी परखड मत व्यक्त केलंय.

Uday Samant on Nashik Tree Cutting: नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला मोठ्या प्रमाणावर वेग आला असून, साधू-महंतांच्या निवासासाठी तपोवन (Tapovan) परिसरातील 1150 एकरांवर साधूग्राम (Sadhugram) उभारण्याची योजना आहे. या कामासाठी 1800 झाडांची तोड (Nashik Tree Cutting) प्रस्तावित असल्याने स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि अनेक सेलिब्रिटींच्या तीव्र नाराजीचा उद्रेक झाला आहे. आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तपोवन वृक्षतोडीच्या मुद्द्यावर आपलं परखड मत व्यक्त केलंय. तपोवनातील झाडं वाचली पाहिजे. या मताचा मी आहे. झाडं जगली पाहिजे ही आमची भूमिका आहे. माझ्या बोलण्याचा कोणाला राग येईल. पण माझी मतं आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. नाशिक येथे क्रेडाईच्या बैठकीत उदय सामंत बोलत होते.
उदय सामंत म्हणाले की, महिंद्राचा प्रकल्प नाशिकमधून जाणार, अशी अफवा पसरविण्यात आली. काही लोकांना खोटं बोलण्याची सवय आहे. पण, असे होणार नाही. महिंद्राचा 10 हजार लोकांना रोजगार देणारा प्रकल्प नाशिकमध्ये येणार आहे. पुढच्या दोन वर्षांत 200 कोटीचा प्रकल्प आम्ही तुम्हाला देणार आहोत. या बदल्यात तुम्ही आम्हाला काय देणार? हे माहिती पाहिजे. नाशिकचे एक्झिबिशन सेन्टर कुठे करायचे ते सांगा. तपोवनातील झाडं वाचली पाहिजे. या मताचा मी आहे. झाडं जगली पाहिजे ही आमची भूमिका आहे. माझ्या बोलण्याचा कोणाला राग येईल. पण माझी मतं आहेत, असे त्यांनी म्हटले.
Uday Samant on Nashik Tree Cutting: ...तर मी राजीनामा द्यायला तयार
उदय सामंत पुढे म्हणाले की, कोकणात असाच एक प्रकल्प येणार याविषयी चर्चा होती. फक्त उदय सामंत या कंपनीचा मालक आहे. एवढेच सांगणे बाकी राहीले होते. पण, अशा कोणत्याही कंपनीला आम्ही येऊ देणार नाही. नियमात राहून आपण काम केले तर भ्रष्टाचार होणार नाही. उद्योजकांना इन्सेन्टिव्हसाठी उद्योगमंत्र्यांना भेटण्याची वेळ आली का? असे कोणीही हात वर करून सांगावे. मी राजीनामा द्यायला तयार आहे, असे आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले.
Uday Samant on Nashik Tree Cutting: एक संधी शिवसेनेला द्या
आम्ही काय-काय केले हे दाखविले आहे. एक संधी शिवसेनेला द्या. मी चार वर्षांत कधीही राजकीय भाषण केले नाही. पण, आता निवडणूक आहे म्हणून मी राजकीय बोलत आहे. इथे 200 उद्योजक आहेत ते निर्णय घेऊ शकतात. तुमच्याकडे कामगार आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्ही हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहचू शकतात. त्यामुळे तुम्ही मदत करा. कुंभमेळा काळात येणाऱ्या व्हिआयपींसाठी तंबू निवास करणार आहोत. एक्झिबिशन सेन्टर करण्याचे प्रपोजल आम्ही महापालिकेला दिले होते. जागा 11 वर्ष त्यांच्या ताब्यात राहणार आणि 1 वर्ष कुंभमेळ्याच्या कामासाठी वापरले जाणार असे स्ट्रक्चर उभे करणार आहोत. निवडणुकीनंतर तुम्ही सांगाल तसा विकास करू, असे देखील उदय सामंत यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा























