WWE Fighting: चक्क ट्रेनमध्येच झाली WWE सारखी फायटिंग; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
WWE Fighting: जपानच्या दोन रांगड्या जमाच्या कुस्तीपटूंनी हाय-स्पीड बुलेट ट्रेनमध्ये WWE स्टाईल फाईटिंग केली, हे पाहून प्रवासीही भांबावून गेले. आता सोशल मीडियावरही हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
WWE Fighting: सध्या सोशल मीडियावर (Social Media) ज्या व्हिडीओची सर्वाधिक चर्चा होत आहे, त्यापैकी एक म्हणजे, चालत्या बुलेट ट्रेनमधील WWE स्टाईल फायटिंगचा व्हिडीओ. या चालत्या ट्रेनमधील (Train) कुस्तीच्या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आणि जगभरात हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला. टोकियोमधील (Tokyo) डीडीटी प्रो-रेसलिंगद्वारे या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 75 प्रवाशांनी भरलेल्या रेल्वे डब्यात हा कुस्तीचा सामना रंगल्याचं वृत्त बीबीसीने दिलं आहे.
याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मिनोरू सुझुकी आणि सानशिरो टाकागी या कुस्तीपटूंमधील रोमांचक सामन्याची तिकिटं अवघ्या 30 मिनिटांत विकली गेली.
बुलेट ट्रेनमध्ये कुस्तीच्या सामन्याचं आयोजन
कुस्तीचा हा सामना प्रसिद्ध शिंकनसेन बुलेट ट्रेनमध्ये भरवण्यात आला, ही ट्रेन टोकियो ते नागोया दरम्यान धावते. जेव्हा सुझुकी आणि टाकगी चालत्या ट्रेनमध्ये कुस्तीसाठी उतरले, तेव्हा ट्रेनमधील प्रवाशांनी एकच जल्लोष केला. प्रवाशांना हा थरारक अनुभव घेताना फार आनंद होत होता. प्रवासी या दोन्ही कुस्तीपटूंना चिअर करत होते. यावेळी ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या अनेकांनी हे क्षण त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले, यानंतर सामन्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, हा कुस्तीचा रोमांचक सामना अर्धा तास चालला. या सामन्यानंतर जपानमधील लोकप्रिय खेळ म्हणून कुस्तीचं नाव आणखी उंचावलं गेलं आहे. आता या कुस्तीचे सामने विविध ठिकाणी रंगवले जात आहेत. हल्क होगन आणि कर्ट अँगल या दोघांसारख्या प्रसिद्ध कुस्तीपटूंनी यापूर्वी जपानी कुस्तीमध्ये आपलं योगदान दिलं आहे, या दोघांमुळेही जपानी कुस्तीची लोकप्रियता वाढली आहे.
— Rasslin' (@RasslinClips) September 18, 2023
जपानमधील सुमो रेसलिंगची लोकप्रियता वाढली
जपानने पर्यटकांसमोरही त्यांचा पारंपरिक खेळ सुमो कुस्ती (Sumo Wrestling) सादर केला आहे, जपानमध्ये ही कुस्ती पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होते. प्रेषकांच्या वाढत्या आकर्षणामुळे या खेळाला एक नवीन दृष्टी प्राप्त झाली आहे. विविध ठिकाणी या खेळाचं आयोजन केलं जात आहे. ताज्या उदाहरणाबद्दल बोलायचं झाल्यास, टोकियोमधील एका रेस्टॉरंटमध्ये नुकतंच जेवणाच्या वेळी सुमो रेसलिंगचं (Sumo Wrestling) प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलं होतं. जपानमधील हा खेळ पाहण्यासाठी आजकाल दूरदूरवरून लोक येत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
World News: 17 बायका, 96 मुलं, तरीही भरलं नाही 'या' व्यक्तीचं मन; आता करु इच्छितो अनोखा विक्रम