World's Oldest Color: जगातील सर्वात जुना रंग कोणता? खूप मनोरंजक आहे याचं उत्तर आणि त्यामागची कहाणी
World's Oldest Color: जर तुम्हाला कोणी विचारलं की, तुमचा आवडता रंग कोणता? तर कदाचित तुम्ही एकही सेकंद वाया न घालवता लगेच उत्तर द्याल. जर हेच तुम्हाला सर्वात जुन्या रंगाबद्दल विचारलं तर? जाणून घेऊयात सविस्तर...

World's Oldest Color: रंग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्याला आजूबाजूला अनेक रंग (Colour) पाहायला मिळतात. आपल्या भावना तसेच, आपल्या दैनंदिन जीवनात रंगाचा मोठा सहभाग असतो. पम तुम्हाला माहिती आहे का? जगातील सर्वात जुना रंग कोणता? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? आपल्यापैकी बहुतेकांना असं वाटतं की, काळा आणि पांढरा हे दोन जगातील सर्वात जुने रंग आहेत. पण असं नाही. काळा (Black) आणि पांढरा (White) हे जगातील सर्वात जुने रंग (Oldet Colour) नाहीत. मग जगातील सर्वात जुना, सर्वात पहिला रंग कोणता? या प्रश्नाचं उत्तर आज जाणून घेऊयात... यासोबतच या रंगामागील खरं शास्त्र काय आहे? हे देखील जाणून घेऊयात...
सर्वात जुन्या रंगामागील शास्त्र काय?
अलीकडील संशोधनात असं म्हटलं आहे की, सर्वात जुना रंग दुसरा कुठलाही नसून तो गुलाबी (Pink) आहे. संशोधकांना असं आढळलं, की गुलाबी रंग सुमारे 1.1 अब्ज वर्षं जुना आहे. संशोधकांनी जमिनीतून लाखो वर्षं जुना खडक (Stone) काढला असून त्याच्या आत गुलाबी रंग सापडला आहे. हा रंग बबल गम (Bubble Gum) सारखा आहे. ऑस्ट्रेलियन संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे, या संशोधनावरून हे सिद्ध होतं की, पृथ्वी अस्तित्वात आल्यापासूनच गुलाबी रंग अस्तित्वात आहे. पूर्वीच्या काळात, गुलाबी रंग हा द्रव्याच्या (Fluid) स्वरुपात असायचा, जो सूक्ष्म जीवांद्वारे बनवला जायचा. शास्त्रज्ञांच्या प्रचंड संशोधनानंतर हे सिद्ध झालं की, जगातील सर्वात जुना रंग काळा किंवा पांढरा नसून तो गुलाबी आहे.
संशोधनातून समोर आली ही बाब
ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या (ANU) रिसर्च स्कूल ऑफ अर्थ सायन्सेसचे प्रमुख अभ्यासक नूर गुएनेली यांनी एका निवेदनात म्हटलं की, सूर्यप्रकाशावर जगणारे प्राचीन प्राणी हे हरवलेल्या महासागराला देखील गुलाबी रंग देतात.
लाईव्ह सायन्सला दिलेल्या मुलाखतीत, एएनयूच्या रिसर्च स्कूल ऑफ अर्थ सायन्सेसच्या सहयोगी प्राध्यापकांनी सांगितलं की, सर्वात जुने मृत सेंद्रिय पदार्थ, उदाहरणार्थ, सायनोबॅक्टेरियाचं फूल, जे समुद्राच्या तळाशी त्वरीत बुडतं आणि अब्जावधी वर्षांनी एक रंग घेतं. त्या फुलाने देखील चमकदार गुलाबी रंग धारण केला आहे. बऱ्याच अभ्यासानंतर पाश्चात्य शास्त्रज्ञांनी देखील सर्वात जुना रंग हा केवळ गुलाबी असल्याचं म्हटलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Zero Born Country: 'या' देशात नाही होत एकाही बाळाचा जन्म; कारण जाणून थक्क व्हाल
Before You Go
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया





















