महिलेनं दत्तक घेतली 13 मुलं; दिसायला एकदम खरी, पण त्यामागील सत्य काही वेगळंच...
Weird News: या मुलांना पाहून ती खरी आहेत की खोटी हे ओळखणं देखील कठीण होतं. तरीही अॅलिस या मुलांची अगदी खऱ्या मुलांप्रमाणे काळजी घेते, त्यांचे डायपर देखील बदलते.
Weird News: आपलं मूल (Baby) जगात येण्याआधी प्रत्येक पालक (Parents) त्याच्यासाठी अनेक तयारी करत असतात. ते स्वतःला चांगले पालक म्हणून सिद्ध करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. काही लोक तर अगदी वेगळ्या प्रकारे मातृत्व आणि पितृत्व निभावण्यासाठी स्वत:ला तयार करत असतात. आता लंडनच्या या महिलेकडेच बघा. जेस अॅलिस असं या महिलेचं नाव असून तिने तिला तिच्या बाळाचं संगोपन नीट करता यावं, यासाठी भन्नाट काम हाती घेतलं आहे. ती स्वत:ला आई बनण्याचं प्रशिक्षण देणं सुरू केलं आहे.
डायपर बदलण्यापासून फिरायला नेण्यापर्यंत सर्व काही
27 वर्षीय जेस अॅलिस तिचा 33 वर्षीय होणारा नवरा एव्हरी रासेनसोबत राहते आणि हे जोडपे 13 मुलांचे पालक आहेत. आता हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही 13 मुलं खरी नसून त्या बनावट बाहुल्या (Fake Doll) आहेत, ज्या अगदी खऱ्या बाळांप्रमाणे दिसतात. या लहान मुलांकडे पाहता ते खरे की खोटे? हे ओळखणं कठीण होतं. मात्र अॅलिस या मुलांची अगदी खऱ्या मुलांप्रमाणेच काळजी घेते. नकली बाहुल्या असूनही ती दररोज त्यांचे डायपर बदलते आणि स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी ती त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाते.
कोरोनाने मला एकटं पाडलं - अॅलिस
अॅलिसने 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात बनावट बाहुल्या विकत घेणं सुरू केलं, कारण त्यावेळी तिला खूप एकटं वाटत होतं. तिने एकामागून एक खऱ्या बाळांसारख्या दिसणार्या 13 बेबी डॉल्स विकत घेतल्या. न्यूयॉर्क पोस्टनुसार, अॅलिसला मुलं खूप आवडतात. तिला स्वतःलाही आई व्हायचं आहे, त्यामुळेच तिने या बेबी डॉल्स खरेदी केल्या आहेत. अॅलिसने सांगितलं की तिने पहिली बेबी डॉल 24 हजार रुपयांना विकत घेतली होती, तिचं नाव रेबेका आहे. यानंतर तिला आणखी बाहुल्या विकत घेण्याचं वेड लागलं.
बाहुल्यांना पाहून लोक जातात चक्रावून
अॅलिसने दुसरी डॉल नोव्हेंबर 2020 मध्ये खरेदी केली होती, अॅलिसने त्या डॉलचं नाव सॅम ठेवलं. या डॉलची किंमत 58 हजार रुपये होती. एलिसने हळूहळू एकूण 13 बाहुल्या खरेदी केल्या आहेत, ज्यांची एकूण किंमत 6.24 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. तिने विकत घेतलेल्या सर्वात महागड्या बाहुलीचं नाव आहे कुकी. कुकी ही प्रीमॅच्युअर बेबी आहे, तिची किंमत 1.74 लाख रुपये आहे. अॅलिस म्हणाली की, मला ही मुलं खोटी असली तरी त्यांच्याकडे बघायला आवडतं. त्यांना पाहून लोक सहसा त्यांना खरी मुलं असल्याचंच समजतात.
हेही वाचा:
Udaipur: लीला पॅलेसमध्ये परिणीती-राघवचा शाही विवाहसोहळा; पर प्लेट जेवणाचा रेट ऐकून व्हाल थक्क