एक्स्प्लोर

Video : काळ्या रंगाचे नूडल्स पाहिलेत का? व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी महिलेची उडवली खिल्ली, म्हणाले...

Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक महिला काळ्या रंगाचे नूडल्स बनवताना दिसतेय.

Viral Video : फिरायला कुणाला आवडत नाही, प्रत्येकाला जगभरात फिरायला आवडतं. प्रत्येक ठिकाणाचं एक वैशिष्ट्य असतं. नैसर्गिक, ऐतिहासिक सौंदर्यासह खाद्यसंस्कृतीमुळे बरीच ठिकाणं प्रसिद्ध असतात. मुंबई, दिल्लीसारख्या जगभरातील अनेक शहरांत विविध प्रकारचे स्ट्रीट फूड आढळतात. हे स्ट्रीट फूड (Street Food) खवय्यांच्या पसंतीस उतरतात. अनेकजण आवर्जून त्या त्या ठिकाणचं स्ट्रीट फूड खातात आणि त्याची चवही चाखतात. त्यांच्या जीभेवर ही चव कायमच राहते. पण काही ठिकाणी मिळणारे स्ट्रीट फूड पाहून अथवा ऐकून तुम्ही चकीत झाल्याशिवाय राहणार नाहीत. जगात सर्वात आश्चर्यकारक स्ट्रीट फूड चीन (China) आणि थायलंडमध्ये (Thailand) पाहायला मिळतं, असे नेटकरी म्हणतात. सध्या येथीलच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक महिला काळ्या रंगाचे नूडल्स विकत असल्याचं दिसत आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी त्या महिलेला ट्रोल केलंय. 

थायलंड ते व्हिएतनाम आणि चीनमध्ये मिळणाऱ्या स्ट्रीट फूडमध्ये सर्वात जास्त नॉनव्हेजचा वापर केला जातो. या पदार्थांमध्ये अगदी झुरळांपासून रेशीम किडे आणि विंचूंपर्यंत अनेक कीटक खायला दिले जातात.  असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक महिला चक्क काळ्या रंगाचे नूडल्स बनवताना दिसतेय. या नूडल्सने नेटकऱ्यांना आश्चर्यचकित केलं आहे. 

पाहा व्हिडीओ : 

View this post on Instagram
 
A post shared by Our Collection (@ourcollecti0n)

तुम्ही कधी पाहिलेत का काळ्या रंगाचे नूडल्स?

सध्या सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला नूडल्स बनवताना दिसतेय. मिळालेल्या माहितीनुसार, हे थायलंडचं स्ट्रीट फूड आहे. पण, काळ्या रंगाचेही नूडल्स असू शकतात ? या विचाराने खाद्यप्रेमींचा गोंधळ उडाला आहे. या व्हिडीओच्या खाली कमेंट्समध्ये अनेक यूजर्सने प्रश्न विचारला आहे. 

व्हिडीओला 6 मिलियनहून जास्त व्ह्यूज

सोशल मीडियावर Our Collection या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेतोय. या व्हिडीओला 6.6 मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि एक लाख 22 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओ पाहून यूजर्स अनेक प्रकारच्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया देत आहेत. तर, अनेकांनी त्या महिलेची खिल्लीही उडवली आहे. एका यूजरने लिहिले आहे की, 'हे तर पावसात दिसणारे गांडूळ वाटतय.' तर, दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, याच कारणामुळे जगभरात कोरोना व्हायरस पसरला.' तर, काहींनी 'ही मला सापाची छोटी पिल्लं वाटतायत' अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

महत्त्वाच्या बातम्या : 

Guinness World Record : बिग डॅडी क्रॅब... 10 फूट लांब पायांचा खेकडा पाहिलायत? 'या' खेकड्याच्या नावावर विश्वविक्रम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra Election

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget