(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोशल मीडियावर Click here ट्रेंड , ही नक्की काय भानगड आहे? जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
Click Here Trend : ट्विटरवर सध्या Click Here ट्रेंड खूप व्हायरल होत आहे. अनेकांनी हा ट्रेंड फॉलो केला आहे. पण, तुम्हा-आम्हासारख्या अनेकांना प्रश्न पडला आहे की, हे नक्की काय आहे? याबाबत सविस्तर वाचा.
मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) म्हणजेच आधीच्या ट्विटर (Twitter) वर सध्या क्लिक हिअर (Click Here) ट्रेंड पाहायला मिळत आहे. सध्या हजारो एक्स मीडिया वापरकर्त्यांनी या ट्रेंडमध्ये उडी घेतली आहे. शनिवारी संध्याकाळपासून एक्स (X) वर Click Here असा मजकूर लिहिलेला ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट आणि शेअर केला जात आहे. युजर्सनी Click Here म्हणजेच 'येथे क्लिक करा' ट्रेंड खूप फॉलो आहे. पण, तुम्हा-आम्हासारख्या अनेकांना प्रश्न पडला आहे की, हे नक्की काय सुरु आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ही नक्की भानगड काय आहे, हे या बातमीत सविस्तर जाणून घ्या.
सोशल मीडियावर Click here ट्रेंड
शनिवारी संध्याकाळपासून एक्स (X) मीडियावर Click Here असं लिहिलेला एक साधा फोटो हजारो युजर्सने पोस्ट केला आहे. ट्वीटर म्हणजे एक्स मीडियावर सुरु केल्यावर तुम्हाला Click Here असं लिहिलेल्या अनेक पोस्ट दिसतील. या फोटोमध्ये ठळक काळ्या फॉन्टमध्ये 'Click Here' म्हणजेच 'येथे क्लिक करा' असं लिहिलं आहे आणि त्या खाली तिरप्या खालच्या दिशेने निर्देशित करणारा बाण दाखवण्यात आला आहे. या बाणाच्या टोकाजवळ ALT दिसत आहे.
नक्की ही काय भानगड आहे?
शनिवारी संध्याकाळपासून ट्विटरवर हा ट्रेंड सुरु आहे. आतापर्यंत अनेकांनी हा फोटो पोस्ट केला आहे. तर, इतर वापरकर्ते हा ट्रेंड नेमका काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या ट्रेंडने अनेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत की हे सर्व काय सुरु आहे, असा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. तुमच्या टाइमलाइनवर Click Here आणि ALT या पोस्ट मागचा नेमका अर्थ काय हे वाचा.
जाणून घेण्यासाठी ही सविस्तर माहिती वाचा
एक्स मीडियावरील हे नवीन फिचर आहे, ज्यामुळे युजर्स अपलोड केलेल्या फोटोंमध्ये मजकूर किंवा माहिती जोडण्यास मदत करते. हे फिचर मजकूर-ते-स्पीच (Text-To-Cpeech) ओळख आणि ब्रेल भाषेच्या (Braille language) मदतीने फोटो समजून घेण्यास दृष्टिहीनांना मदत करू शकते.या फिचरमध्ये तुम्ही फोटो पोस्ट करत ALT द्वारे त्यासोबत मजकूर जोडू शकता. यामध्ये तुम्ही 420 शब्दांपर्यंत मजकूर लिहू शकता.
Click Here आणि ALT काय आहे?
तुम्ही Click Here आणि ALT Text फिचर वापरून या फोटसोबत माहिती किंवा मजूकर लिहू शकता. तुम्हाला या पोस्टमधील मजकूर किंवा वाचण्यासाठी ALT वर क्लिक करावं लागेल. तुम्ही जोपर्यंत ALT वर क्लिक करत नाही, तोपर्यंत तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट Click Here फोटो दिसत राहील आणि तुम्ही ALT वर क्लिक केल्यावर मजकूर ओपन होईल.
ऑल्ट टेक्स्ट फिचर
ऑल्ट टेक्स्ट फिचर ट्विटर म्हणजे X मीडियावर 2016 मध्ये पहिल्यांचा लाँच करण्यात आलं होतं. ट्विटरने आठ वर्षांपूर्वी ऑल्ट टेक्स्ट फिचर लाँच करताना, आम्ही ट्विटरवर शेअर केलेली माहिती जास्तीत जास्त युजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी खात्री करण्यासाठी प्रत्येकाला सक्षम करत आहोत, असं कंपनीने म्हटलं होतं.
राजकारण्यांचीही ट्रेंडमध्ये उडी
त्यानंतर आता राजकारण्यांनी आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोशल मीडिया कॅम्पेनसाठी या ट्रेंडचा वापर केला आहे. भाजपने एक्स मीडिया अकाऊंटवरून Click Here पोस्ट केलं आहे. आम आदमी पार्टी, शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही याबाबत पोस्ट केली आहे.
भाजपने X ट्रेंड फॉलो करत टाइमलाइनवर Click Here पोस्ट केलं आणि ALT टेक्स्ट मध्ये लिहिलं, पुन्हा एकदा मोदी सरकार.
— BJP (@BJP4India) March 30, 2024
आपने Click Here पोस्ट केलं आणि ALT टेक्स्ट मध्ये लिहिलं आहे की, देश वाचवण्यासाठी 31 मार्चला चलो रामलीला.
What is the click here pic story.? My timeline is full of it!
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) March 30, 2024
— AAP (@AamAadmiParty) March 30, 2024