एक्स्प्लोर

VIDEO: बाल्कनीत उभे राहून भांडता-भांडता तोल गेला; जोडपे तिसऱ्या मजल्यावरुन कोसळून थेट रस्त्यावर, व्हिडीओ व्हायरल

Trending: व्हायरल व्हिडीओ पाहून सर्वजण एकच म्हणत आहेत की, घराच्या बाल्कनीत उभं राहून कधीही भांडू नये. या एका चुकीमुळे एक जोडपे भांडता-भांडता बाल्कनीतून कोसळून थेट रस्त्यावर पडले आहेत.

Viral Video: आजकाल लोक छोट्या-छोट्या गोष्टीवरून एकमेकांशी भांडू लागतात. जोडप्यांमध्ये भांडणं होणं आता नित्याचं झालं आहे. सोशल मीडियावर (Social Media) दररोज याच प्रकारचे काही ना काही व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात, ज्यामध्ये जोडपी (Couples) एकमेकांशी कसून भांडताना दिसतात.

असाच एक व्हिडिओ हल्ली सोशल मीडियावर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, ज्यामध्ये एका जोडप्याने चक्क बाल्कनीतच भांडायला सुरुवात केली. पुढे त्यांच्या भांडणाने इतकं रौद्र रुप घेतलं की, भांडता-भांडता हे जोडपं तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून थेट खाली रस्त्यावर कोसळलं. हा व्हिडीओ पाहून सारेच चकित झाले आहेत.

नेमकं घडलं काय?

बाल्कनीत उभ्या असलेल्या जोडप्यात कोणत्या तरी मुद्द्यावरून भांडण सुरू असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. हळूहळू शाब्दिक भांडण धक्काबुक्कीत बदलतं. हे दोघेही बाल्कनीच्या रेलिंगला धडकतात. ही रेलिंग त्यांचं वजन सांभाळू शकत नाही आणि नंतर अचानक ती तुटते. रेलिंग तुटताच दोघेही चांगलेच जोरात रस्त्यावर कोसळतात.

भांडणातील नवरा पाठीवर पडतो, तर त्याची बायको डोक्यावर आपटून जमिनीवर आदळते. हा व्हिडिओ खूपच धक्कादायक आहे. दोघेही बाल्कनीतून पडल्यानंतर त्यांच्या अवतीभोवती उभ्या असलेल्या गाड्यांचे हॉर्नही वाजू लागतात.

बाल्कनीतून खाली आदळले जोडपे

हा व्हिडिओ रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरातील असल्याचे लोकांचं म्हणणं आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं आहे की, या प्रकारानंतर दोघांनाही ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे त्यांच्या गंभीर दुखापतीवर उपचार करण्यात आले. व्हिडिओ पाहून असं दिसतं की, रस्ता आणि बाल्कनीमध्ये सुमारे 20 ते 25 मीटर अंतर आहे. त्यामुळे बाल्कनीतून पडल्यामुळे त्यांची हाडं मोडली असावीत. हे जोडपे राहत असलेल्या वास्तूबाबत असं सांगण्यात आले आहे की, ती शहराच्या 150 वर्षं जुन्या ऐतिहासिक भागात आहे.

लोक काय म्हणाले?

या व्हिडीओवर लोकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. काही लोकांनी घडलेल्या प्रकारावर दु:ख व्यक्त केलं, तर काही लोकांनी या जोडप्याची मज्जा घेतली. व्हिडीओवर कमेंट करत एकाने म्हटलं की, 'खरंच हे फारच धक्कादायक आहे, आशा आहे की यांचा मृत्यू झाला नसावा.'

एका व्यक्तीने म्हटलं की, यापुढे हे दोघं आता कधी भांडणार नाही. तर काही लोक म्हणाले, हा व्हिडीओ पाहून एखाद्या चित्रपटाचा सीन सुरू असल्यासारखं वाटत आहे. 

हेही वाचा:

VIDEO: 'आय ड्रॉप' समजून चुकून डोळ्यात टाकला 'गम'; बेतलं महिलेच्या जीवाशी, पुढे काय झालं ते पाहाच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget