VIDEO: 'आय ड्रॉप' समजून चुकून डोळ्यात टाकला 'गम'; बेतलं महिलेच्या जीवाशी, पुढे काय झालं ते पाहाच
Viral Video: महिलेने सांगितलं की डोळ्यात गम टाकल्यानंतर तिने तिचे डोळे पटकन बंद केले. डोळे बंद केल्यामुळे तिच्या पापण्या चिकटून राहिल्या.
Viral Video: बऱ्याचदा लक्ष नसल्याने आणि लापरवाहीमुळे आपण अशा चुका करतो, ज्याचे परिणाम फार वाईट होतात. कॅलिफोर्नियामध्ये (California) राहणाऱ्या महिलेसोबत काहीसा असाच प्रकार घडला आहे. या महिलेने डोळ्यात 'आय ड्रॉप' टाकण्याऐवजी चुकून 'नेल ग्लू' टाकला. नेल ग्लू हा काहीसा फेविक्विकसारखा (Fevi Quick) गम असतो, जो खोटी नखं (Nails) चिकटवण्यासाठी वापरला जातो.
आता हा 'नेल ग्लू' चुकून डोळ्यात टाकल्याने महिलेचे डोळे पूर्णपणे बंद झाले. जेव्हा डोळ्यात तीव्र जळजळ होण्यास सुरुवात झाली, तेव्हा तिला समजलं की तिने घाईघाईत खूप मोठी चूक केली, तिने डोळ्यात 'आय ड्रॉप' टाकण्याऐवजी 'नेल ग्लू' टाकला आहे.
नेमका कसा घडला हा प्रकार?
हा विचित्र प्रकार ज्या महिलेसोबत घडला तिचं नाव जेनिफर एवरसोल आहे आणि ती कॅलिफोर्नियाची रहिवासी आहे. जेनिफरने नुकताच तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती म्हणते, तिने आय ड्रॉप हा नेल ग्लूच्या अगदी बाजूलाच ठेवला होता. 'आय ड्रॉप' आणि 'नेल ग्लू'च्या बॉटलाचा आकार देखील अगदी सारखाच होता. घाईत तिला समजलं नाही की, कोणता 'आय ड्रॉप' आहे आणि कोणता 'नेल ग्लू' आहे.
एक डोळा पूर्णपणे बंद
जेनिफरला वाटलं, तिने जी बॉटल उचलली ती 'आय ड्रॉप'ची आहे, पण ती 'नेल ग्लू'ची होती. नेल ग्लूचा ड्रॉप डोळ्यात पडताच महिलेच्या डोळ्याची जळजळ व्हायला लागली, तेव्हा तिला समजलं की तिने डोळ्याच नखांचा गम टाकला आहे. नेल ग्लू टाकल्यामुळे जेनिफरचा एक डोळा पूर्णपणे बंद झाला, ज्यानंतर तिला थेट रुग्णालय गाठावं लागलं.
पापण्या चिकटल्या
नखांचा गम डोळ्यात टाकल्यानंतर जेनिफरने तिचे डोळे पटकन बंद केले. डोळे बंद केल्यामुळे डोळ्यांच्या पापण्या चिकटल्या. जर जेनिफरने डोळे बंद केले नसते तर कदाचित तिच्या पापण्या चिकटल्या नसत्या. जेव्हा ती डॉक्टरकडे गेली, तेव्हा डॉक्टरांना सुद्धा तिची हालत बघून धक्का बसला, कारण त्यांनी अशी केस याआधी कधी पाहिली नव्हती.
पापण्या कापण्याची वेळ
जेनिफर जेव्हा डॉक्टरकडे गेली, तेव्हा डॉक्टरने पापण्यांवर एक मलम लावला आणि डोळे चोळून पापण्या वेगळ्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अजून एक आय ड्रॉप टाकला, यानंतर देखील पापण्या चिकटलेल्याच होत्या. बंद डोळ्यांवर इलाज म्हणून शेवटी डॉक्टरने जेनिफरच्या पापण्या कापल्या, ज्यानंतर जेनिफरचा बंद झालेला डोळा पुन्हा उघडला.
Woman mistakes super glue for eye drops pic.twitter.com/Ca50qiDTjc
— CCTV IDIOTS (@cctvidiots) October 2, 2023
फेकून दिल्या नेल ग्लूच्या सर्व बॉटल
जेनिफरने मुलीच्या नखांसाठी नेल ग्लू आणला होता. वापर करुन झाल्यानंतर जेनिफरने नेल ग्लू आयड्रॉपच्या बाजूला ठेवला होता. या एका चुकीमुळे जेनिफरला इतका मोठा फटका सहन करावा लागला. घडलेल्या घटनेनंतर जेनिफरने घरी येऊन नेल ग्लूच्या सर्व बॉटल फेकून दिल्या.
हेही वाचा:
Rolls Royce: गजब जुगाड! अवघ्या 45 हजार रुपयांमध्ये मारुती 800 बनली करोडोंची 'रोल्स रॉयस'; सारेच चकित