(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : 'क्यो किसी को...' भंगार गोळा करणारा 'तानसेन', गाणं गात करतोय काम; अनोख्या शैलीची सोशल मीडियावर चर्चा
Viral Video : एका भंगारवाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये तो सलमान खानच्या 'तेरे नाम' चित्रपटातील गाणं गात आहे.
Viral Video of Scrap Collector : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. अनेक वेळा रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले वेगळ्या शैलीत गाणं गात विक्री करताना किंवा इतर काम करताना दिसतात. काही महिन्यांपूर्वी शेंगदाणे विकणाऱ्या भूवन बडायकरचं 'कच्चा बदाम' (Kacha Badam) गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सध्या अशाच एक व्हिडीओची चर्चा आहे. भूवन बडायकरच्या 'कच्चा बदाम' प्रमाणेच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. हा व्हिडीओ आहे. भंगार विकणाऱ्या 'तानसेन'चा. हा व्यक्ती गाणं गात भंगार विकताना दिसत आहे.
चित्रपट दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी ट्विटरवर शेअर केला व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये एक भंगारवाला अनोख्या शैलीमध्ये भंगार गोळा करताना दिसत आहे. हा भंगारवाला सुरात गाणं गात भंगार गोळा करत आहे. लोकांचं लक्ष वेधण्यासाठी हा भंगारवाला गाणं गाताना दिसत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ :
What a public adulation of the song from Tere Naam even after 20 years . Proud of this film pic.twitter.com/TkLnKaQJWe
— satish kaushik (@satishkaushik2) February 8, 2023
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, भंगारवाला सायकल घेऊन फिरत आहे. त्याच्या हातामध्ये एक माईक आहे. यावर तो गाणं गात भंगार गोळा करत आहे. व्हिडीओमध्ये भंगारवाला 2003 साली आलेल्या अभिनेता सलमान खानच्या 'तेरे नाम' चित्रपटातील गाणं गाताना दिसत आहे. 'क्यों किसी को खुशी के बदले...' असे या गाण्याचे बोल आहेत.
हा भंगारवाला 'तेरे नाम' चित्रपटामधील 'ये प्यार में क्यूँ होता है..' हे गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सोशल मीडियाच्या इतर अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर आणि लाईक करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तेरे नाम या गाण्याची लोकप्रियता 20 वर्षांनंतरही कमी झालेली नाही. या चित्रपटाचा अभिमान आहे.'
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 66 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 3 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून हा आकडा सतत वाढत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत या भंगारवाल्याच्या गाण्यातं कौतुक केलं आहे. एक यूजरने याला बेस्ट परफॉर्मन्स म्हटलं आहे. अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री भूमिका चावला यांच्यावर चित्रीत झालेले हे गाणे उदित नारायण यांनी गायले आहे. 2003 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनीच केले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :