Viral Video: मुलाला सिगारेटचं व्यसन, म्हणून आईनं दिली खतरनाक शिक्षा; व्हिडीओ व्हायरल
एका महिलेचा आणि तिच्या मुलाचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला. या व्हिडीओ दिसत आहे की, एक महिला तिच्या मुलाला शिक्षा देत आहे.
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) काही मजेशीर तर काही समाजिक संदेश देणारे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. अनेक वेळा आई आणि मुलांमधील प्रेमळ नात्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. या व्हिडीओंमध्ये आईची मुलांबाबत असणारी काळजी दाखवली जाते. असाच एका महिलेचा आणि तिच्या मुलाचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिला तिचा मुलगा व्यसन करतो म्हणून त्याला शिक्षा देत आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ काही सोशल मीडिया अकाऊंटवरुन अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ घर का कलेश (Ghar Ke Kalesh) नावाच्या अकाऊंटवरुन ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला दिसत आहे जी आपल्या मुलाच्या दारुच्या आणि सिगारेटच्या व्यसनाला कंटाळलेली आहे. आपल्या मुलानं व्यसन करणं सोडावं, असं त्या महिलेला वाटतं. त्यामुळे ती महिला आपल्या मुलाला एक शिक्षा देते. 'मुलगा आणि आईमधील भांडण, मुलानं सिगरेट सोडावी. त्यासाठी आईने मुलाच्या डोळ्यात लाल मिरची पावडर टाकली.', असं या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ:
Son-Mom kalesh (Mother Rubbed Red Chilli In the Eyes of Son for Smoking)pic.twitter.com/HI0CmK28lq
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 2, 2022
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका महिलेनं आपल्या मुलाला एका खांबाला बांधून त्याच्या डोळ्यात तिखट टाकले. आईनं लाल तिखट टाकल्यानं तो मुलगा जोरजोरात ओरडू लागतो. व्हिडीओमध्ये मुलाचा ओरडण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आतापर्यंत हा व्हिडीओ 48 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी या व्हिडीओला लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
टीप : अशा प्रकारच्या कृत्याचे आणि हिंसेचे एबीपी माझा समर्थन करत नाही. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ बातमी म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: