Viral Video : 1 मिनिट, 5 आलिशान वाहने आणि किंमत 7 कोटी! चोरीचे धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर एका चोरीच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून, संपूर्ण प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये चोर एका मिनिटात 5 आलिशान वाहने चोरताना दिसत आहेत
Viral Video : एकापेक्षा एक आश्चर्यकारक चोरीच्या घटनेचा (luxury cars) आपण नेहमी ऐकतो किंवा पाहतो, ज्या पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. आजकाल चोरांची हिंमत एवढी वाढली आहे की, ते बिनधास्त कोणाच्याही घरात शिरून चोरी करतात. तसेच या चोरांना पकडले जाण्याची किंवा पोलिसांची भीती नसते. दिवसाढवळ्याही चोर लोकांना लुटून पळून जातात, मात्र आजकाल असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे, ज्याला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
We are currently investigating an incident where multiple luxury cars were stolen from a unit on Brentwood Road in #Bulphan on 11 November.
— Essex Police (@EssexPoliceUK) December 5, 2022
Did you witness anything suspicious? If so, please contact us. pic.twitter.com/2huktS0PJI
एका मिनिटात 5 आलिशान वाहने चोरली
या व्हिडिओमध्ये चोर फक्त एका मिनिटात 5 आलिशान वाहने चोरताना दिसत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्या सर्व वाहनांची किंमत सुमारे 7 कोटी रुपयांपर्यंत आहे. याबाबत माहिती अशी की, रात्रीच्या अंधारात त्यांनी एका औद्योगिक युनिटचे गेट तोडून चोरांनी आत प्रवेश केला. त्यानंतर हे चोर कोणालाही न घाबरता एकापेक्षा एक सुंदर आणि महागडी वाहने उचलून ते जात राहिले. यात पोर्श आणि मर्सिडीज सारख्या गाड्यांचाही समावेश आहे. मात्र, युनिटमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याच्या सर्व कृत्ये कैद होत आहेत, हे कदाचित चोरांनी माहीत नसावे.
चोरट्यांनी एका मिनिटात 7 कोटींची कार कशी चोरली?
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चोर एका औद्योगिक युनिटचे मोठे लोखंडी गेट उघडत आहे. त्यानंतर लगेच दुसरा चोर तिथे येतो, तर पहिला चोर आलिशान कारमध्ये बसतो आणि गाडी घेऊन निघून जातो. त्यानंतर चोरट्यांचे अन्य साथीदारही बाकी वाहनांसह वेगाने निघून जातात. ही मोठी घटना घडवून आणण्यासाठी या चोरांना केवळ एक मिनिट लागला.
पोलिसांनी जारी केला व्हिडीओ
चोरीची ही घटना गेल्या महिन्यात म्हणजेच 11 नोव्हेंबर रोजी घडली होती, ज्याचा व्हिडीओ आता एसेक्स पोलिसांनी जारी केला आहे. हे प्रकरण ब्रिटनच्या एसेक्सचे आहे. मात्र, अद्यापपर्यंत चोरट्यांबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्या याचा तपास सुरू असून या घटनेत सहभागी असलेल्या चोरांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
महत्त्वाच्या बातम्या :