Teacher Love Story: महिला शिक्षिका विद्यार्थिनीच्या प्रेमात पडली! लिंग बदलले आणि लग्न केले, अनोखी प्रेमकहाणी जाणून घ्या
Viral Teacher Love Story : प्रेमासाठी महिला शिक्षकाने चक्क लिंग बदलण्याचा निर्णय घेतला. ही अनोखी प्रेमकहाणी आता देशात चर्चेचा विषय बनली आहे.
Viral Teacher Love Story : प्रेम खरंच आंधळं असतं, हे सिद्ध करणारी एक अनोखी घटना राजस्थानच्या (Rajasthan) भरतपूरमधून समोर आली आहे. इथल्या शाळेतील महिला शिक्षकाने आपल्याच विद्यार्थ्याशी लग्न केले. यासाठी महिला शिक्षकाने चक्क लिंग बदलण्याचा निर्णय घेतला (Viral Teacher Love Story) आणि शस्त्रक्रिया केली. त्यानंतर दोघांनी लग्न केले. ही अनोखी प्रेमकहाणी आता देशात चर्चेचा विषय बनली आहे.
...आणि दोघांचे शाळेतच प्रेम फुलले
मीरा भरतपूर येथील एका माध्यमिक शाळेत पीटी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. याच शाळेत कल्पना नावाची विद्यार्थिनी शिकते. कल्पना ही कबड्डीपटू असून तीन वेळा राष्ट्रीय स्तरावर खेळली आहे. शिक्षिका मीराला विद्यार्थीनी कल्पनाचा खेळ आवडत होता. त्यामुळे शिक्षिका कल्पनाच्या प्रेमात पडली आणि त्यांचे प्रेम फुलले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
Bharatpur, Rajasthan | Teacher undergoes gender change surgery to become a male & marry a student
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) November 8, 2022
"I always wished to undergo surgery to change my gender. I had my first surgery in December 2019," says Aarav Kuntal, teacher who changed his gender pic.twitter.com/S70JGrprwr
महिला शिक्षिकेचा लिंग बदलण्याचा निर्णय
लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मीराने पुढाकार घेतला आणि लिंग बदलण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर मीरा आरव बनली. यानंतर कल्पना आणि आरवचे लग्न झाले. विशेष म्हणजे दोघांच्याही कुटुंबीयांनी आक्षेप घेतला नाही. आरवला चार मोठ्या बहिणी आहेत. चौघेही विवाहित आहेत.
लिंग बदलल्यामुळे अनेक समस्यांना तोंड
आधी मीरा आणि आता आरव यांना महिला कोट्यातून सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. कल्पनानेही लिंग बदलाचे समर्थन केले. नोकरीमध्ये नाव आणि लिंग बदलल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे आरवने सांगितले.
आरवचे वडील म्हणाले
या लग्नावर आरवच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. म्हणाली मला पाच मुली आहेत. मीरा सर्वात लहान असली तरी ती लहानपणापासूनच मुलासारखी राहिली. तो आता मुलगा आहे, म्हणून मी आता आनंदी आहे. तसेच या लग्नामुळेही खूप आनंदी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या