Trending News : भन्नाट ऑफर! एक कोळी पकडा आणि चार हजार रुपये कमवा, सोशल मीडियावर जॉब ऑफर व्हायरल
Amazing Job Offer : एका महिलेनं कोळी पकडण्यासाठी चार हजार रुपयांची ऑफर दिली आहे. या महिलेने सोशल मीडियावर लिहिलं आहे की, जर कुणी कोळी पकडण्यात एक्सपर्ट असेल तर त्यांनी संपर्क करा.
Women Giving Job for Catching Spider : प्रत्येक जण दोन वेळेची भूक भागवण्यासाठी मिळेल ते काम करतो, मग ते लहान असो वा मोठं. जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत. त्या-त्या कामानुसार पैसा मिळतो, पण काही कामे अशी असतात. ज्यामध्ये तुलनेनं मेहनत कमी आणि पैसा जास्त मिळतो. अशा कामांची नेहमीच जोरदार चर्चा होते. सध्या सोशल मीडियावर अशीच एक जॉब ऑफर व्हायरल होत आहे. ही नोकरी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
एक कोळी पकडा आणि 4 हजार रुपये कमवा
हे काम आहे कोळी पकडण्याचं हो, तुम्ही जे वाचताय ते खरं आहे. एका महिलेने कोळी पकडण्यासाठी चक्क चार हजार रुपयांची ऑफर दिली आहे. या महिलेने सोशल मीडियावर लिहिलं आहे की, जर कुणी कोळी पकडण्यात एक्सपर्ट असेल तर त्यांनी संपर्क करा. सोशल मीडियावर ही जॉब ऑफर सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर एका महिलेने ही जॉब ऑफर पोस्ट केली होती. महिलेने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, तिच्या घरात एक मोठा कोळी आहे. जो कोणी हा कोळी तिच्या घरातून बाहेर काढून टाकेल, ती त्याला 50 डॉलर्स म्हणजेच सुमारे 4 हजार रुपये देईल.
विचित्र जॉब ऑफर व्हायरल
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ही अनोखी नोकरी देणारी महिला ऑस्ट्रेलियातील रहिवासी असून मूळची ब्रिटिश आहे. सोशल मीडियावर या विचित्र कामाची ऑफर देताना या महिलेनं लिहिलं आहे की, मला माझ्या घरातून कोळी बाहेर काढायचा आहे आणि जो व्यक्ती हे काम करेल त्याला ती पैसे देईल. महिलेनं पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, तिच्या घरातील कोळी आकाराने खूप मोठा आहे. यामुळे ती खूप घाबरलेली आहे. या कामाच्या बदल्यात तिनं 50 डॉलर्स म्हणजेच 4 हजार रुपये देणार असल्याचं सांगितलं आहे.
मदत न मिळाल्याने पोलिसांना बोलावलं
या महिलेने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, जर कोणी कोळी पकडण्या एक्सपर्ट असेल तर त्यानं तिच्याशी संपर्क साधावा आणि काम करून पैसे कमवा. मात्र, महिलेच्या या पोस्टवर तिच्याशी कोणीही संपर्क साधला नाही, तेव्हा तिने दुसरा मार्ग शोधला. या महिलेनं नंतर पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. पोलिसांनीही महिलेला तातडीने मदत केली नाही.
सोशल मीडियावर मेसेज व्हायरल
महिलेची सोशल मीडियावरील ही पोस्ट पाहून या कामासाठी कोणीही तिच्याशी संपर्क साधला नाही पण, सोशल मीडियावर तिच्या या जॉब ऑफरची जोरदार चर्चा होत आहे. काहीजण या पोस्टवर मजेदार कमेंट करत आहेत तर काही नेटकरी ही पोस्ट शेअर करत आहेत.