Video Viral : इको फ्रेंडली गाय! प्लास्टिक पिशवीत अन्न दिले, म्हणून महिलेला शिंगांनी उचलून 5 फूट दूर फेकली
Video Viral :गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ लोकांमध्ये चर्चेत आहे. जिथे एका संतापलेल्या गाईने महिलेला शिंगाने उचलून मारले.
Video Viral : रस्त्यावर फिरणारे भटके प्राणी (Animals) अनेकदा संतप्त स्वभावाचे पाहायला मिळतात. कोणाच्या मागे लागले तर एखाद्याचा पाठलाग सोडत नाही. तर कधी कधी या प्राण्याच्या हल्ल्यात लोकांना जीवही गमवावा लागतो. सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक व्हिडीओ (Viral Video) तुम्हाला पाहायला मिळतील, गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ लोकांमध्ये चर्चेत आहे. यात एका संतापलेल्या गाईने महिलेला शिंगावर उचलून मारले. पण याचे कारण काय?
प्लास्टिकच्या पिशवीत दिले अन्न
हा प्रकार उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील आहे. तेथे रागाच्या भरात एका गायीने महिलेला शिंगावर उचलून मारले. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका महिलेने गायीला प्लास्टिक पिशवीत अन्न दिले. ही पिशवी बंद असल्याने गाईला अन्न खाणे शक्य होत नव्हते. महिलेने गाईसमोरील पिशवी उघडताच गाय संतापली आणि तिने अचानक वृद्ध महिलेला आपल्या शिंगांनी उचलून मारले.
सीसीटीव्हीमध्ये घटना कैद
इथल्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली, या अपघातात वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याचे समजते, महिला जखमी झाल्याचे समजताच नातेवाईकांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेला कळवले, जखमी महिलेला 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या महिलेवर उपचार सुरू आहेत, भटक्या जनावराने फेकल्यामुळे वृद्ध महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. गायीने महिलेला जोरात फेकल्याने महिलेला शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे या महिलेला आरोग्य कर्मचाऱ्यांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
..तर ही दुर्घटना घडली नसती
जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेने बांधलेल्या गो निवाऱ्यात भटक्या जनावरांना ठेवण्याबाबत सातत्याने सांगितले जात आहे, मात्र मुरादाबादमध्ये याकडे दुर्लक्ष होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मनपाकडून या भटक्या जनावरांना गोठ्यात व्यवस्थित ठेवले असते, तर ही दुर्घटना घडली नसती आणि वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली नसती.
अचानक गाय झाली हिंसक, महिला जखमी
गेल्या वर्षी असाच एक प्रकार हरियाणामध्ये घडला होता. शहरात फिरणाऱ्या भटक्या गुरांमुळे अनेक सामान्य लोकं बळी पडत आहे. हिसार जिल्ह्यात एक गाय अचानक हिंसक झाली आणि एका वृद्ध महिलेला शिंगावर घेऊन दूर फेकले. गायीने पहिला फटका मारल्यानंतर गाय दुसरी मारायला आली तेव्हा महिलेने तिची शिंगे पकडली. महिलेने सुमारे 5-7 मिनिटे बचावासाठी खूप प्रयत्न केले, परंतु ती गायीपासून स्वतःला वाचवू शकली नाही. नंतर गायीने तिला उचलून फेकून दिले. यानंतर तीन-चार टक्कर झाली. महिलेने खूप आरडाओरडा केल्यावर आजूबाजूचे लोक बाहेर आले आणि महिलेचे प्राण वाचवले. या घटनेत महिलेच्या हाताला दुखापत झाली तसेच तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या.
महत्त्वाच्या बातम्या :