Fish : भाल्यासारख्या शिंगाचा हा मासा नेमका कोणत्या समुद्रात आढळतो? वाचा रंजक माहिती
Fish : नरव्हाल व्हेल प्रजातीचे मासे साधारण 90 वर्षांपर्यंत जगू शकतात.
Fish : असं म्हणतात की, ज्या प्रकारे पृथ्वीवर विविध प्रकारचे प्राणी अस्तित्वात आहेत, त्याचप्रमाणे समुद्राच्या आतही वेगळ्या प्रकारचे जग वसलेले आहे. या जगात असे प्राणी आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की कदाचित हे प्राणी या जगात अस्तित्वातच नाहीत. आज आपण अशाच एका प्राण्याबद्दल बोलणार आहोत. हा प्राणी एक प्रकारचा मासा आहे. पण, हा सर्वसामान्य मासा नसून एका वेगळ्याच प्रकारचा हा मासा आहे. या माशाच्या डोक्यावर एक शिंग आहे ज्यामुळे तो इतर माशांपेक्षा वेगळा ठरतो. हे अतिशय खास प्राणी आहेत जे फक्त समुद्राच्या एका भागात आढळतात आणि इतरांपेक्षा वेगळे ठरतात. हा प्राणी नेमका कसा दिसतो आणि तो कुठे आढळतो या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
हा प्राणी कोणता?
आपण ज्या प्राण्याबद्दल बोलत आहोत तो एक प्रकारचा मासा आहे. या माशाला नरव्हाल व्हेल (Narwhal Whel) असं म्हणतात. नरव्हाल व्हेल प्रजातीचे मासे साधारण 90 वर्षांपर्यंत जगू शकतात. विशेष बाब म्हणजे, हे प्राणी समुद्रात तर आढळतात. पण, प्रत्येक ठिकाणच्या समुद्रात आढळत नाहीत. तर, फक्त ग्रीनलँड, कॅनडा, नॉर्वे आणि रशियाच्या आसपास हे मासे आढळतात. म्हणजेच ज्या ठिकाणी समुद्राची हवा तिथलं वातावरण खूप थंड आहे अशा ठिकाणी हा मासा आढळतो. या माशाची लांबी सुमारे 13 ते 18 फूट असते. या माशांच्या रंगाबद्दल बोलायचे झाल्यास ते पांढरे किंवा राखाडी रंगाचे असतात.
हे मासे इतरांच्या तुलनेत वेगळे कसे दिसतात?
हा मासा ज्या प्रकारे दिसतो, संपूर्ण पृथ्वीवर असा कोणताही मासा किंवा प्राणी अस्तित्वात नाही. कारण या माशाच्या चेहऱ्यावर भाल्यासारखे शिंग असतात. हे शिंग टोकदार असून ते ज्याप्रकारे बाहेर आले आहे, त्यावरून ते अतिशय धोकादायक असल्याचे दिसून येते. हा मासा रात्री विचित्र आवाज काढतो. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, ते शिकार करताना त्यांच्या जोडीच्या इतर माशांशी संवाद साधण्यासाठी असा आवाज काढतात. हे मासे दिसायला जरी वेगळे असले तरी मात्र, आता त्यांची लोकसंख्या हळूहळू कमी होत आहे. पृथ्वीच्या वाढत्या तापमानाचा आता त्यांच्यावरही परिणाम होत आहे. तसेच, हवामान बदलाचा परिणाम यांवरच नाही तर बहुतेक सागरी जीवांवर झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
GK: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर समुद्रकिनारी इतके दगड का आहेत? काय आहे त्यांचं काम? जाणून घ्या