GK: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर समुद्रकिनारी इतके दगड का आहेत? काय आहे त्यांचं काम? जाणून घ्या
Mumbai Marine Drive: मरीन ड्राईव्हला भेट देणार्यांना समुद्रकिनाऱ्याच्या कठड्यावर बसण्याची नक्कीच इच्छा असते. तुम्ही कधी विचार केलाय का की त्याखाली असंख्य दगड का आहेत? ते नैसर्गिक आहेत की मानवनिर्मित?
Mumbai Marine Drive: स्वप्नांची नगरी म्हटल्या जाणार्या मुंबईच्या (Mumbai) मरीन ड्राईव्हचे दृश्य अतिशय विहंगम आहे. मुंबईत जाऊन मरीन ड्राईव्हचा उल्लेख केला नाही तर ते क्वचितच शक्य आहे. मरीन ड्राईव्हवर लोक येतात. त्यांना त्या ठिकाणी शांतता वाटते म्हणून ते तिथे येऊन बसतात. तिथे असणाऱ्या खडकांवर पाण्याच्या लाटांचा आदळण्याचा आवाज सर्वांनाच आवडतो. मरीन ड्राईव्हवर हे सर्व एकसारखे दगड कुठून आले याचा विचार कधी केला आहे का? ते नैसर्गिक आहेत की मानवाने बनवले आहेत? माणसांनी बनवले असेल तर ते तिथे का पडून आहेत? याबद्दल आज जाणून घेऊया.
मरीन ड्राईव्हचा इतिहास
मुंबईतील मरीन ड्राईव्ह 1920 च्या सुमारास बांधण्यात आलं. मरीन ड्राईव्हच्या भव्य वळणावर रात्रीच्या वेळी पथदिवे प्रज्वलित केले जातात तेव्हा हे दृश्य खरोखरच पाहण्यासारखं असतं, म्हणूनच याला 'क्वीन्स नेकलेस' असंही म्हटलं जातं. मरीन ड्राईव्हचं दृश्य रात्रीच्या वेळी उंच इमारतींमधून पाहिल्यास अतिशय सुंदर दिसतं.
हे दगड मरिन ड्राईव्हवर आले कसे?
मरीन ड्राईव्हवर कुणी गेल्यावर त्याला समुद्रकिनारच्या कठड्यावर बसण्याची इच्छा नक्कीच होते. त्याच कठड्याच्या खाली पसरलेल्या दगडांना टेट्रापॉड म्हणतात. लोक शांतता मिळावी यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी तिथे जातात, परंतु हे टेट्रापॉड नैसर्गिक नसून ते मानवाने बनवले आहेत आणि ते दगड एका खास कारणासाठी बनवले गेले आहेत. हे सर्व दगड समान आकाराचे आहेत.
या दगडांचं नेमकं काम काय?
हे दगड शहराचं मजबूत आणि भयंकर लाटांपासून संरक्षण करण्यासाठी बनवण्यात आले आहेत आणि तिथे ठेवण्यात आले आहेत. वास्तविक, जेव्हा समुद्राच्या जोरदार लाटा किनाऱ्यावर आदळतात तेव्हा दूरवर त्यांचं कंपन होतं, त्यामुळे हे टेट्रापॉड दगड समुद्राच्या किनाऱ्यावर ठेवण्यात आले आहेत. हे घन टेट्रापॉड शहराचं प्रदूषण आणि इतर समस्यांपासून संरक्षण करतात. ते एकमेकांशी गुंफलेल्या स्थितीत ठेवण्यात आले आहेत, जेणेकरुन हे दगड भरतीवेळी लहरींचा प्रभाव कमी करू शकतील.
या टेट्रापॉड दगडांचं वजन किती?
नव्वदच्या दशकात हे दगड मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आणण्यात आले होते. टेट्रापॉडचा प्रथम वापर फ्रान्समध्ये झाला. त्यांचं वजन 2 ते 10 टन असू शकतं. तितकं वजन नसतं तर समुद्राच्या जोरदार लाटांमुळे ते शहराच्या आसपासच्या परिसरात फेकले जाऊ शकतात. हे दगड समुद्राच्या लाटांचा प्रवाह कमी करतात.
हेही वाचा: