एक्स्प्लोर

IPO : MobiKwik, विशाल मेगा मार्ट, साई लाइफ सायन्सेसचे आयपीओ लिस्ट होणार, गुंतवणूकदार मालामाल होणार,GMP कितीवर? 

IPO Listing Today: विशाल मेगा मार्ट, वन मोबिक्विक सिस्टीम्स आणि साई लाइफ सायन्सेस या कंपन्यांचे आयपीओ लिस्ट होणार आहेत. गुंतवणूकारांना या आयपीओतून चांगला परतावा मिळेल.  

IPO Listing Today मुंबई : भारतीय शेअर बाजारात बीएसई आणि एनएसईवर तीन मेन बोर्ड आयपीओ लिस्ट होणार आहेत. यामध्ये विशाल मेगा मार्ट, मोबिक्विक आणि साई लाईफ सायन्सेस च्या आयपीओचा समावेश आहे. तीन आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी दमदार प्रतिसाद देत तगडं सबस्क्रिप्शन केलं होतं. ज्या गुंतवणूकदारांना या कंपन्यांच्या आयपीओचे शेअर अलॉट झाले आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण या तिन्ही आयपीओच्या जीएमपीनुसार लिस्टींग झाल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो.  

विशाल मेगा मार्ट

विशाल मेगा मार्टचा आयपीओच्या माध्यमातून 8 हजार कोटी रुपयांची उभारणी करण्याचा प्रयत्न होता. हा आयपीओ 29 पट सबस्क्राइब झाला होता संस्थात्मक आणि गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या आयपीओला  मोठ्या प्रमाणात सबस्क्राइब केलं होतं. कंपनीनं आयपीओचा किंमतपट्टा 78 रुपये निश्चित केला होता. ग्रे मार्केट प्रीमियमचा विचार केला असता आयपीओचं लिस्टींग 100 रुपयांच्या जवळपास होऊ शकतं. त्यामुळं गुंतवणूकदारांना प्रतिशेअर 28 टक्के परतावा मिळू शकतो.  

वन मोबिक्विक सिस्टीम्स

स्टॉक एक्सचेंजवर वन मोबिक्विक सिस्टीम्सच्या आयपीओचं धमाकेदार लिस्टींग होण्याची शक्यता आहे. या आयपीओचा जीएमपी  58 टक्के म्हणजेच 160 रुपये दाखवत आहे. मोबिक्विकच्या आयपीओचं दमदार लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. कंपनीनं आयपीओचा किंमतपट्टा 279 रुपये प्रतिशेअर निश्चित केला होता. जीएमपीनुसार आयपीओ लिस्ट झाल्यास एक शेअर 440 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. वन मोबिक्विक सिस्टीम्सचा आयपीओ 126 पट सबस्क्राइब झाला होता. रिटेल गुंतवणूकदारांनी 142 पट आयपीओ सबसक्राइब केला होता. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आयपीओ 126 पट सबस्क्राइब केला होता. कंपनीचा आयपीओच्या माध्यमातून 576 कोटी रुपयांच्या उभारणीचा प्रयत्न आहे.   

साई लाइफ सायन्सेस

साई लाइफ सायन्सेसच्या आयपीओ ( Sai Life Sciences Limited IPO) चं देखील चांगलं लिस्टींग होण्याची शक्यता आहे. या आयपीओचा जीएमपी विशाल मेगा मार्ट किंवा मोबिक्विक पेक्षा कमी आहे. आयपीओचा जीएमपी 13 टक्के असून त्यानुसार आयपीओ लिस्ट झाल्यास प्रतिशेअर परतावा 72 रुपये मिळू शकतो.कंपनीनं किंमतपट्टा 549 रुपये निश्चित केला होता. जीएमपीनुसार आयपीओ 621 रुपयांवर लिस्ट होऊ शकतो. कंपनीचा आयपीओद्वारे 3042 कोटी रुपयांच्या उभारणीचा प्रयत्न होता. हा आयपीओ 10.27  पट सबस्क्राइब झाली होती.  

इतर बातम्या : 

 

IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

PSU Banks : सार्वजनिक बँकानी विक्रमी 1.98 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला; FY26 मध्ये GNPA ऐतिहासिक नीचांकी पातळीवर
PSU Banks : सार्वजनिक बँकानी विक्रमी 1.98 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget