(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी अडकणार विवाहबंधनात, निकाहाची तारीख ठरली; व्हायरल पोस्टमुळे खळबळ
Mohammed Shami & Sania Marriage : क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा 20 तारखेला लग्न करणार असल्याच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Mohammed Shami & Sania Mirza Marriage T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची (Team India) दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. भारतीय संघ विश्वचषकाच्या सूपर 8 मध्ये पोहोचला आहे. एकीकडे आज 20 जून रोजी भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanisthan) सामना रंगला असताना दुसरीकडे टीम इंडियाचा (Team India) स्टार क्रिकेटपटू मोहम्मद शमी (Mohammed Shami) संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे.
सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी करणार लग्न, पोस्ट व्हायरल
भारतीय संघाच्या स्टार खेळाडू मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुसरं लग्न करणार असल्याचं बोललं जातं आहे. भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) सोबत लग्नबंधनात अडकणार (Sania Mirza and Mohammed Shami Marriage Date) असल्याचं बोललं जात आहे.
20 तारखेला सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमीचा निकाह?
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने शोएब मलिकसोबत काडीमोड घेतल्यानंतर आता ती मोहम्मद शमीसोबत लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाही तर मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा या दोघांच्या लग्नाची तारीखही लीक झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी हे दोघं 20 तारखेला निकाह करणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
टेनिसस्टार सानिया मिर्झा दुसऱ्यांदा लग्न करणा
टेनिसपटू सानिया मिर्झा नुकतीच पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून विभक्त झाली आहे. यानंतर सानिया दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची सतत चर्चा होती. सानियाने मात्र हे नेहमीच नाकारले आहे. सध्या त्याचे नाव मोहम्मद शमीशी जोडले जात आहे. दोघेही लवकरच निकाह करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या निकाहाची तारीखही लीक झाल्याचं बोललं जात आहे. 20 ऑगस्टला दोघेही निकाह करू शकतात, असा दावा व्हायरल पोस्टमधून केला जात आहे.
सोशल मीडियावरी व्हायरल पोस्टमुळे खळबळ
दरम्यान, मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा या दोघांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या अफवांमध्ये कितपत तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट सांगता येणार नाही. मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाकडून याबाबत कोणत्याही प्रकारचे अपडेट देण्यात आलेले नाहीत. तसेच याबाबत कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :