Revolver Rani : 'रिवॉल्वर रानी'ची चर्चा! बंदूक हमारी, गोली हमारी और वक्त भी हमारा होगा...; हातात पिस्तूल घेतलेल्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल
Revolver Rani Viral Video : हातात पिस्तूल घेतलेल्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.
![Revolver Rani : 'रिवॉल्वर रानी'ची चर्चा! बंदूक हमारी, गोली हमारी और वक्त भी हमारा होगा...; हातात पिस्तूल घेतलेल्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल revolver rani video woman made reel with revolver in hand in agra viral video Revolver Rani : 'रिवॉल्वर रानी'ची चर्चा! बंदूक हमारी, गोली हमारी और वक्त भी हमारा होगा...; हातात पिस्तूल घेतलेल्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/03/65272999a1530ed2ccc0e0f46cb41fcd1691072384355322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Revolver Rani Video : बंदूक हमारी, गोली हमारी और वक्त भी हमारा होगा... असं म्हणत बंदूक हातात मिरवणाऱ्या 'रिवॉल्वर रानी'ची सध्या जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ही महिला हातात रिव्हॉल्व्हर घेऊन दिसत आहे. या व्हिडीओमुळे खळबळ माजली आहे. व्हिडीओ व्हायरल झाला असून पोलिसांनी त्याची दखल घेतली आहे.
'रिवॉल्वर रानी'ची चर्चा
एका महिलेने हातात रिव्हॉल्व्हर घेऊन रील बनवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चित्रपटातील गाणी आणि डायलॉगवर ही महिला अभिनय करत आहे. रिव्हॉल्व्हर राणी बनलेल्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पण, अद्याप पोलिसांना या महिलेचा पत्ता सापडलेला नाही. यापूर्वीही अनेक तरुणांनी असे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले होते, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
रिव्हॉल्व्हर असलेल्या महिलेचा व्हिडीओ
हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील एका महिलेचा असल्याची माहिती समोर येत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक गाणे सुरु असून त्यावर महिला अभिनय करताना दिसत आहे. या व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मंगळवारी एका महिलेचे दोन व्हिडrओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये महिला हातात रिव्हॉल्व्हर घेऊन दिसत आहे. महिलेने घराच्या छतावर उभं राहून व्हिडीओ बनवला आहे.
बंदूक हमारी, गोली हमारी और वक्त भी हमारा होगा...
'रिवॉल्वर रानी'च्या व्हायरल व्हिडीओमध्ये ही महिला रिव्हॉल्व्हर धरलेली दिसत आहे आणि बॅकग्राऊंडला एक गाणं वाजत आहे. या गाण्याचे बोल 'हम पिस्तूल हाथ में रहा है, ना किसी के बाप से धरते हैं...' असे आहेत. 10 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये महिला घराच्या छतावर उभी राहून गाण्यावर अभिनय करताना दिसत आहे.
पोलिसांकडून महिलेचा शोध सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने इंस्टाग्रामवर रीलसाठी एक व्हिडीओ बनवला होता. या महिलेचा आता आणखी एक व्हिडीओही समोर आला आहे. या 12 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये महिलेने हातात रिव्हॉल्व्हर धरली आहे. व्हिडीओमध्ये डायलॉग ऐकू येत आहे, जे असे आहेत- 'बंदूक हमारी, गोली हमारी और वक्त भी हमारा होगा...' व्हिडिओबाबत पोलिस उपायुक्त सूरज कुमार राय यांनी सांगितले की, व्हिडीओचा तपास आणि महिलेचा शोध सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Viral Video : फोनवर बोलताना इमारतीवरून खाली पडला तरुण, अन...; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)