Viral Video: जेव्हा पाकिस्तानी कलाकाराने रबालवर वाजवले भारतीय राष्ट्रगीत 'जन गण मन'; अवघे जग झाले मंत्रमुग्ध!
Pakistani Musician Viral Video : पाकिस्तानी कलाकाराचा भारतीय राष्ट्रगीत वाजवताना एक व्हिडीओ सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Pakistani Musician Viral Video : एकीकडे संपूर्ण भारत स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष (75th year of Freedom) साजरे करत असताना, एका पाकिस्तानी कलाकाराकडून (Pakistani Musician Siyal Khan) आलेल्या शुभेच्छा सोशल मीडिया युजर्सच्या हृदयाला भिडल्या. पाकिस्तानी रबाब संगीतकार सियाल खान याचा भारतीय राष्ट्रगीत वाजवताना एक व्हिडिओ अलीकडेच ट्विटरवर अपलोड करण्यात आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
निसर्गाच्या सानिध्यात बनविला व्हिडीओ
व्हिडीओमध्ये सियाल खान रबाबच्या माध्यमातून "जन गण मन" ची धून वाजवताना दिसत आहे. सियाल खानने निसर्गाच्या सानिध्यात एका सुंदर ठिकाणी हा व्हिडिओ बनवला आहे. पोस्ट शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, सीमेपलीकडील माझ्या प्रेक्षकांसाठी ही भेट आहे.
Here’s a gift for my viewers across the border. 🇵🇰🇮🇳 pic.twitter.com/apEcPN9EnN
— Siyal Khan (@siyaltunes) August 14, 2022
पाकिस्तानी कलाकाराचा व्हिडीओ व्हायरल
रबाब हे एक तंतुवाद्य आहे, जे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि काश्मीरमध्ये खूप लोकप्रिय आहे. जन गण मनाची धून असलेला हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून तो केवळ ट्विटरवर 11 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 65 हजार युजर्सनीही या व्हिडिओला लाईक केले आहे.
दोन्ही देशांकडून प्रतिक्रिया
या मनमोहक व्हिडिओवर भारतीय आणि पाकिस्तानीं नागरिकांसकडून प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की, "पाकिस्तानी संगीतकार सियान खानने रबाबवर भारताचे राष्ट्रगीत वाजवले. ज्यामुळे मन मंत्रमुग्ध झाले आहे." दुसर्या युझरने लिहिले की, "सीमेपलीकडून खूप प्रेम.. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!" अशा शुभेच्छांच्या कमेंट सोशल मीडीयावर उमटत होत्या.
यंदाचा 15 ऑगस्टचा दिवस खास
भारताच्या स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन म्हणून यंदाचा 15 ऑगस्टचा उत्सव विशेषतः महत्त्वपूर्ण होता. यामुळेच भारत सरकारने देशवासीयांचा उत्साह वाढवण्यासाठी विशेषत: हर घर तिरंगा आणि आझादी का अमृत महोत्सव असे अनेक सण आणि मोहिमा सुरू केल्या.
महत्वाच्या बातम्या :
- PM Modi : वयाच्या शंभरीतही PM मोदींच्या मातोश्रींची देशभक्ती पाहून सारेच आश्चर्यचकित, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
- Police For Rent : पोलिसांसोबत संपूर्ण पोलीस स्टेशन देखील भाड्याने मिळेल, जाणून घ्या भारताच्या 'या' राज्यातील अनोखा कायदा
- 75th independence day : रस्त्यावरुन जात होती तिरंगा यात्रा, वृद्ध व्यक्तीने पाहताच केला सलाम, व्हिडीओ व्हायरल