World News: पाकिस्तानात किती रुपये युनिट आहे वीज? तिथेही आकडा टाकून केली जाते वीज चोरी
Pakistan Electricity Rates: भारतातील अनेक राज्यात विजेचे दर हा काळजीचा विषय बनला आहे, लोक विजेचे पैसे वाचवण्यासाठी बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करत आहेत. अशात पाकिस्तानात काय स्थिती आहे? हे जाणून घेऊया.
Pakistan Electricity Rates: पाकिस्तान (Pakistan) सध्या महागाईने हैराण आहे. पाकिस्तानातील प्रत्येकालाच वाढत्या किमतींचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानात विजेच्या दरांसह सर्वच वस्तूंचे दर वाढत आहेत. पाकिस्तानातील विजेचे दर इतके वाढले आहेत की त्यांचं वीज बिल हे त्यांच्या एका पगाराच्या बरोबरीचं झालं आहे. मासिक उत्पन्नापेक्षा अधिक खर्च विजेवर केला जात आहे, अशा स्थितीत खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी अनेकजणांना वीजचोरी करणं भाग पडलं आहे. आता पाकिस्तानात विजेचे दर नेमके काय आहेत? आणि पाकिस्तानातील लोक वीज कशी चोरता? हे पाहूया.
मासिक पगारापेक्षा जास्त विजेचं बिल
DW ने एका पाकिस्तानी व्यक्तीशी चर्चा केली आणि या दरम्यान त्या व्यक्तीने सांगितलं की, त्याचं मासिक उत्पन्न सुमारे 20 हजार रुपये आहे आणि त्याचं मासिक वीज बिल 18 हजार रुपये आहे. अशा परिस्थितीत घरखर्च चालवायचा कसा? असा प्रश्न त्याला पडतो. ही अशी स्थिती पाकिस्तानातील लोकांना वीज चोरी करण्यास भाग पाडते.
ज्याप्रमाणे भारतातील लोक तारेचा आकडा टाकून वीज चोरतात, त्याचप्रमाणे आता पाकिस्तानातील लोकही सरकारी वीज चोरत आहेत. वीजचोरीचं प्रमाण वाढत असल्याने ते थांबवण्यासाठी वीज कंपन्याही प्रयत्नशील आहेत.
पाकिस्तानात किती आहेत विजेचे दर?
नुकतीच एक बातमी आलेली ज्यात म्हटलं गेलं होतं की, पाकिस्तानच्या नॅशनल इलेक्ट्रिक पॉवर रेग्युलेटरी ऑथॉरिटीने प्रति युनिट वीज दर 3.28 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. वाढता आर्थिक भार कमी करण्यासाठी पाकिस्तानच्या प्राधिकरणाने हे पाऊल उचललं होतं. या वाढलेल्या किमती ऑक्टोबरपासून लागू झाल्या आहेत.
जर आपण पाकिस्तानमधील विजेच्या प्रति युनिट दराबद्दल बोललो तर तिथे देखील दर युनिट स्लॉटनुसार आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही 100 युनिटपेक्षा कमी वीज खर्च केल्यास तुम्हाला कमी दर द्यावा लागेल आणि तुम्ही जितके जास्त युनिट खर्च करता, त्यानुसार तुम्हाला जास्त दर द्यावा लागेल. अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये प्रति युनिट विजेची किंमत 50 रुपयांपर्यंत आहे.
गेल्या काही महिन्यांत पाकिस्तान सरकारने विजेच्या दरात मोठी वाढ केली आहे. अवघ्या काही महिन्यांत वीज 20 रुपयांनी महाग झाली. पूर्वी हा दर 35 ते 38 रुपये प्रति युनिट होता, तो आता 50 रुपयांवर पोहोचला आहे. सध्याचा हा दर आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे.
लोक कशी करतात वीज चोरी?
ज्याप्रमाणे भारतात मेन लाईनमध्ये वायर टाकून वीज चोरी केली जाते, त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्येही वीजचोरी होत आहे. पाकिस्तानातही लोक मेन लाईनवर वायर टाकून किंवा आकडा टाकून घरात वीज घेतात. वीज चोरी करण्याच्या या पद्धतीला ट्रॅप ट्रॅपिंग असंही म्हणतात.
हेही वाचा:
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? जाणून घ्या काय सांगतो कायदा