(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Optical Illusion : 'या' फोटोत दडल्यात 7 व्यक्ती; तुम्हाला ओपन चॅलेंज, फक्त 60 सेकंदात शोधून दाखवा!
Optical Illusion : एक 'ऑप्टिकल इल्युजन' फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यात 7 व्यक्ती शोघायच्या आहेत. आम्ही शोधल्या, तुम्ही पाहा तुम्हाला जमतंय का?
Optical Illusion : 'ऑप्टिकल इल्युजन' (Optical Illusion) म्हणजे 'दृश्य भ्रम'. साधारणतः एखादा मजकूर आपण घाईघाईत वाचण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ऑप्टिकल इल्यूजनचा सामना करावा लागतो. सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा नेटकरी याच ऑप्टिकल इल्युजनच्या जाळ्यात सापडले आहेत. एका व्हायरल होणाऱ्या फोटोवरुन नेटकऱ्यांमध्ये चढा-ओढ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये 7 व्यक्ती दडलेल्या आहेत. नेटकरी या व्यक्ती शोधण्यात रमून गेले आहेत.
फोटोंमध्ये दडल्यात 7 व्यक्ती
एक ऑप्टिकल इल्युजनचा (Optical Illusion) फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो दिसायला गॅरेजसारखे दिसते. ज्यामध्ये एक कार उभी असते आणि अनेक वाहनांचे सुटे भाग विखुरलेले दिसत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या चित्रात सात लोक गाडीचे काही भाग घेऊन उभे आहेत किंवा बसलेले आहेत. तुम्हाला फक्त या चित्रात या सात लोकांना शोधायचं आहे.
एकाग्रतेनं तुम्ही सात व्यक्ती नक्कीच शोधू शकता
सुरुवातीला, हा फोटो पाहून तुम्ही पूर्णपणे गोंधळून (Confuse) जाल. चित्रातील या सात लोकांचे चेहरे शोधण्यासाठी तुम्हाला पूर्ण लक्ष केंद्रीत करावं लागेल. तरच तुम्हाला हे सात चेहरे सापडतील. त्यामुळे वेळ घालवू नका. एकाग्र व्हा आणि 7 व्यक्ती शोधा.
तुम्हाला सापडल्या का 7 व्यक्ती? आम्ही शोधल्या
60 सेकंदात शोधायच्या आहेत सात व्यक्ती
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऑप्टिकल इल्युजन पिक्चरसह तुमच्या मेंदूचा व्यायाम करण्यासाठी त्यात एक ट्वीस्ट देण्यात आला आहे. या चित्रातील सातही चेहरे शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 60 सेकंदांचा अवधी दिला जाईल. त्यात लपलेले सात चेहरे तुम्ही ठरलेल्या वेळेत शोधले, तर तुम्ही खऱ्या अर्थानं जिनियस ठराल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Trending News : फोटोमध्ये दडलाय 7 अंकी नंबर, आम्हाला सापडलाय, पाहा तुम्हाला जमतंय का?