Nobel Prize Winner 2023: आतापर्यंत किती भारतीयांना मिळाला नोबेल पुरस्कार? पाहा संपूर्ण यादी
Nobel Prize Winner 2023: आतापर्यंत भारतातील 10 जणांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे.
Nobel Prize Winner 2023: नोबेल पारितोषिक विजेते 2023 च्या नावाची (Nobel Prize Winner 2023) घोषणा आजपासून सुरू होत आहे. याची भारतात नेहमीच चर्चा होत असते. भारताला अमेरिकेच्या तुलनेत खूप कमी वेळा नोबेल पारितोषिक मिळालं आहे. यावेळी विजेत्यांच्या यादीत भारताचा समावेश होणार की नाही, याची माहिती यादी जाहीर झाल्यानंतरच मिळणार आहे. तोपर्यंत भारतातील किती जणांना आतापर्यंत नोबेल पारितोषिक (Nobel Prize) मिळालं आहे ते जाणून घेऊया.
आतापर्यंत भारतातील 10 जणांना नोबेल पारितोषिक
भारत देशात आतापर्यंत एकूण 10 व्यक्तींना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे.
1. भारतातील पहिला नोबेल पुरस्कार रविंद्रनाथ टागोर यांना मिळाला. रविंद्रनाथ टागोर यांना 1913 साली साहित्य ह्या विषयात नोबेल पुरस्कार मिळाला होता. साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानाकरिता रविंद्रनाथ टागोर यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
2. सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्र या विषयात नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
3. हरगोविंद खुराणा यांना 1968 मध्ये मेडिसिन चिकित्सा ह्या विषयात नोबेल पुरस्कार मिळाला होता.
4. मदर तेरेसा यांना 1979 मध्ये शांतता क्षेत्रात नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
5. सुब्रहमण्य चंद्रशेखर यांना 1983 साली भौतिकशास्त्र ह्या विषयात नोबेल पुरस्कार मिळाला होता.
6. अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये अर्थशास्त्र ह्या विषयात नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
7. सर विद्याधर सुरज प्रसाद नायपॉल यांना 2001 साली नोबेल पुरस्कार मिळाला होता.
8. व्य़ंकटरमण रामकृष्णन यांना 2009 मध्ये रसायनशास्त्र ह्या विषयातील नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता.
9. कैलास सत्यार्थी यांना 2014 साली शांती क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
10. अभिजित बॅनर्जी यांना 2019 मध्ये अर्थशास्त्र या विषयात नोबेल पुरस्कार मिळाला होता.
नोबेल पुरस्कार म्हणजे काय?
नोबेल पारितोषिक हा एक अतिशय प्रसिद्ध पुरस्कार आहे जो 6 वेगवेगळ्या क्षेत्रात दिला जातो. हा पुरस्कार अशा लोकांना दिला जातो ज्यांनी गेल्या वर्षभरात मानवजातीला सर्वात मोठा फायदा करून दिला आहे आणि ते विशिष्ट 6 क्षेत्रांशी संबंधित आहेत. मुळात हा पुरस्कार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांत दिला जातो.
नोबेल पुरस्काराचा इतिहास
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नोबेल पुरस्काराचं वितरण केलं जातं. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका संस्थेला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार देण्यात येतो. पहिला नोबेल शांती पुरस्कार इ.स. 1901 मध्ये देण्यात आला होता.
हेही वाचा:
Nobel Prize: नोबेल पुरस्कारासाठी तुम्हीही करू शकता अर्ज? जाणून घ्या काय आहे प्रक्रिया