एक्स्प्लोर

Model Chaiwali VIDEO : मोहक अदा, सावरणारे केस अन् ग्लॅमरचा तडका,'मॉडेल चायवाली'ची डॉली चायवाल्याला टक्कर; लोक म्हणाले, ओव्हरअॅक्टिंगच जास्त

Model Chaiwali Viral Video : डॉली चायवाला आणि वडा पाव गर्लनंतर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ती मॉडेल चायवाली.

मुंबई : चहा म्हणजे भारतीयांसाठी जीव की प्राण, बहुतांश भारतीयांच्या दिवसाची सुरूवात चहानेच होते. गावागावत-शहरांच्या नाक्या-नाक्यावर चहाच्या टपऱ्या आपल्याला दिसतात. बर, भारतात आता चहा बनवणारेही सेलिब्रेटी होऊ लागलेत हे डॉली चहावाल्याकडे पाहून सिद्ध होतंय. सोशल मीडियावर फेमस झालेल्या डॉली चायवाल्याला आता टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये नवीन चहावाली आली आहे. मॉडेल चायवाली असं तिचं नाव असून तिच्या अदा पाहूनच लोकांचे होश उडत आहेत.

डॉली चायवाला आणि वडा पाव गर्लनंतर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ती मॉडेल चायवाली. सध्या लखनऊमध्ये चहा विकणाऱ्या या स्टायलिश मॉडेल चायवालीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पाहून कुणी त्याचं कौतुक करतंय तर कुणी त्यावर विनोदी कमेंट करताना दिसतंय. 

मॉडेल चायवालीची स्टाईलच निराळी

सोशल मीडियावर अलीकडे मॉडेल चायवालीची स्टायलिश स्टाईल सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मॉडेल चायवाली ही स्कुटीवरून येते आणि गाड्यावर येताच कामाला सुरूवात करते. सर्वप्रथम ती गुलाबाची चव असलेला चहा बनवण्यास सुरुवात करते. दुसरीकडे, मॅगी तडका देखील तयार होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, चहा बनवल्यानंतर ती गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवते आणि लोकांना देते.

View this post on Instagram
 
A post shared by The Hungry Panjabi🤤😋 (@thehungrypanjabi_)

मॉडेल चायवाली का व्हायरल होत आहे? 

'मॉडेल चायवाली' ची ओळख केवळ तिच्या चहाच्या स्टॉलसाठीच नाही तर तिच्या फॅशनेबल लूक आणि हसऱ्या चेहऱ्यामुळेही आहे. व्हिडिओमध्ये ती आपल्या टपरीवर चहा बनवताना मॉडेलप्रमाणे पोझ देते आणि ग्राहकांशी संवाद साधते. तिचा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा ही इतर चहावाल्यांपेक्षा वेगळी बनवते. हा नवा ट्रेंड लखनऊमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. 

'मॉडेल चायवाली'च्या चहाच्या स्टॉलवर तरूणांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे ते तिच्या चहाच्या चवीसोबतच तिच्या स्टाइलचे कौतुक करताना थकत नाहीत. तर काहींनी त्यावर विनोदी कमेंटही केल्या आहेत. चहाचा स्वाद कमी आणि ओव्हरअॅक्टिंगच जास्त असं अनेकांनी म्हटलंय. 

लोकांनी व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेतला 

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर thehungrypanjabi नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये त्याच्या टपरीचा पूर्ण पत्ताही लिहिला आहे. 5 दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहणाऱ्या एका यूजरने लिहिले की, चहामध्ये सर्व केसांचा कोंडा मिसळला आहे. एका युजरने लिहिलंय की, चहा ठीक आहे पण मॉडेल कुठे आहे.

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report On Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीस 3.0 ची सुरुवात, पुन्हा आल्यानंतरची आव्हानं काय?Special Report Eknath Shinde :आमदारांचा वाढता दबाव, अखेर एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथSpecial Report Mahayuti Oath Ceremony : अंबानी, अदानी, सुपरस्टार, नव्या सरकारचा ग्रँड शपथविधीZero Hour Mahayuti Oath Ceremony : महायुतीच्या विजयापासून शपथविधीपर्यंत, झिरो अवरमध्ये सखोल चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Embed widget