मुलगा माझाच का? शंका दूर करण्यासाठी बापाने केली DNA टेस्ट, रिपोर्ट समोर आल्यानंतर पायाखलची जमीन सरकली
Trending: एका व्यक्तीने मनात आलेली शंका दूर करण्यासाठी मुलाची DNA टेस्ट केली. टेस्टमधून जे समोर आलं ते ऐकून या व्यक्तीच्या पायाखालची जमीनच सरकली. संपूर्ण प्रकरण काय? जाणून घेऊया.
Trending: भारतातच (India) नाही, तर जगभरात (World) आता DNA टेस्ट करणं सर्वसाधारण झालं आहे. लोक मनात येईल तेव्हा स्वत:ची किंवा त्यांच्या मुलांची DNA टेस्ट करुन घेत आहेत. पण काहीवेळा DNA टेस्टमधून अशा काही गोष्टी उलगडतात, ज्यामुळे कित्येकांचे संसार उद्धवस्त होतात. काहीवेळी कुटुंबात तटातुटी होतात. एका व्यक्तीसोबत अशीच काही घटना घडली आहे, त्याचं कुटुंब अजून तरी एकत्रच आहे. पण DNA टेस्ट केल्यानंतर जी गोष्ट समोर आली ती ऐकून या व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली.
नेमकं घडलं काय?
त्याचं झालं असं की, या माणसाने आपल्या मुलाची डीएनए टेस्ट करून घेतली होती, जेणेकरून तो आपलाच मुलगा आहे का? ही शंका दूर होईल, पण जी शंका त्याच्या मनात घर करून होती, ती अखेर डीएनए टेस्ट झाल्यावर खरी निघाली. त्या व्यक्तीला कळलं की, तो ज्याला आपला मुलगा मानत होता, तो मुळीच आपला मुलगा नाही. ही त्याच्यासाठी खूप वाईट बातमी होती. पण आता तो व्यक्ती कुणासमोर याची वाच्यताही करू शकत नाही.
डीएनए टेस्टमुळे झाला अजब खुलासा
मिररच्या रिपोर्टनुसार, त्या व्यक्तीने सांगितलं की त्याने गुप्तपणे मुलाची डीएनए टेस्ट केली होती, ज्यातून धक्कादायक खुलासा समोर आला. यानंतर आपल्या लव्ह स्टोरीबद्दल सांगताना हा व्यक्ती म्हणाला, त्याची गर्लफ्रेंड त्यांच्या रिलेशनशिपच्या अगदी सुरुवातीलाच गर्भवती राहिली होती. यानंतर त्यांनी लग्न केलं आणि तिने एका मुलाला जन्म दिला.
या व्यक्तीच्या रिलेशनशिपला आज 3 वर्ष झाली आणि त्यांचा मुलगा आज 2 वर्षांचा आहे. परंतु आता ज्या मुलाला प्रेयसीने जन्म दिला तो मुलगा आपला नसल्याचं या व्यक्तीला समजलं आणि त्याचा गोंधळ उडाला. आता परिस्थिती हाताळायची तरी कशी? हे त्याला समजेनासं झालं.
'मुल माझ्यासारखं दिसत नाही'
रिपोर्ट्सनुसार, या 30 वर्षीय व्यक्तीने सोशल मीडियावर आपली कहाणी सांगितली. त्याने सांगितलं की, सुरुवातीला त्याला हे थोडं विचित्र वाटलं. कारण त्याच्या गर्लफ्रेंडने ती गर्भवती असल्याचं सांगितलं होतं आणि तिच्या मुलाचा वडील तूच आहेस, असं जोर देऊन ती सांगत होती. त्याच वेळी या व्यक्तीच्या मनात कुठेतरी शंका होती की, हे मूल आपलं नसावं, कारण ते मूल त्याच्यासारखं दिसत नव्हतं.
त्या व्यक्तीने सांगितलं की, त्याचे केस तपकिरी आणि डोळे हिरवे आहेत, पण या मुलाचे केस सोनेरी आणि डोळे निळे आहेत. मात्र, हे सर्व माहीत असूनही त्या व्यक्तीने आपल्या प्रेयसीला याबाबत काहीही सांगायचं नाही, असं ठरवलं आहे.
शेवटी सत्य काय?
त्या व्यक्तीने सांगितलं की, कदाचित त्याच्या गर्लफ्रेंडने त्याची जाणीवपूर्वक फसवणूक केली नसेल. अशात त्या मुलाचे वडील दुसरं कोणीतरी असल्याचं तिला समजलं तर समस्या निर्माण होईल. पण या मुलाचे खरे वडील नेमके कोण? याचाही शोध या व्यक्तीला घ्यायचा आहे.
हेही वाचा:
VIDEO: मुलाच्या स्कूल मिटींगला अंतर्वस्त्र घालून पोहोचले वडील; पाहून सर्वच अवाक, नेमकं प्रकरण काय?