VIDEO: मुलाच्या स्कूल मिटींगला अंतर्वस्त्र घालून पोहोचले वडील; पाहून सर्वच अवाक, नेमकं प्रकरण काय?
Viral Video: शाळेच्या मिटींगमध्ये अंतर्वस्त्र घालून पोहोचलेल्या या वडिलांचं नाव लॅथम आहे, ज्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video: सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका शाळेतील मिटींगचा (School Meeting) व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी घातलेले कपडे पाहून सारेच अवाक झाले. विद्यार्थ्याचे वडील क्रॉप टॉप आणि शॉर्ट्सवर शाळेच्या मिटींगला पोहोचले होते, त्यांना या कपड्यावर पाहून मिटींगला उपस्थित असलेल्या पालकांपासून (Parents) ते शाळेतील शिक्षकांपर्यंत (Teachers) सगळेच भांबावून गेले. विद्यार्थ्याचे वडील केवळ या कपड्यावर शाळेच्या मिटींगला पोहोचले नाही, तर त्यांनी अशा प्रकारच्या शाळेच्या गणवेशाचा (School Dress Code) विरोध देखील केला.
नेमकं का केलं असं कृत्य?
आता हा सर्व प्रकार अॅरिझोनाच्या (Arizona) एका शाळेत (School) घडला आहे, जिथे विद्यार्थ्यांच्या नवीन गणवेशावरुन वाद निर्माण झाला आहे. गणवेशावरुन वादाचा पहिला अंक मे महिन्यात सुरू झाला. शाळेने विद्यार्थ्यांना गणवेशात थोडी सूट देण्याचा विचार केला. त्यांचं म्हणणं होतं की, 2001 पासून गणवेशात बदल झालेला नाही, त्यामुळे आता यात बदल करणं गरजेचं आहे. नवीन गणवेशानुसार, मुलींना स्लीव्हलेस टॉप आणि आखुड स्कर्ट असा ड्रेस कोड दिला गेला होता. ही गोष्ट शाळेत शिकणाऱ्या अनेकांच्या पालकांना आवडली नव्हती.
व्हायरल झाला वडिलांचा व्हिडीओ
शाळेच्या मिटींगमध्ये आखुड टॉप आणि शॉर्ट्सवर आलेल्या वडिलांचं नाव लॅथम आहे, ज्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लॅथम यांनी पोडियमवर उभं राहून स्वत:चे कपडे काढले आणि शाळेच्या मिटींगंमध्ये उपस्थित असलेल्या पालकांशी बोलणं सुरू केलं. यावेळी त्यांनी शाळेला विचारणा केली की, शाळेच्या मिटींगसाठी हा ड्रेस कोड योग्य आहे का?
अभ्यासापासून मुलांचं मन विचलित
लॅथम यांनी म्हटलं की, त्यांनी लोकल स्टोरमधून हे कपडे खरेदी केले. शाळेने ठरवलेल्या नवीन ड्रेस कोडचा त्यांनी तीव्र निषेध केला. त्यांनी म्हटलं की, एक वडील म्हणून मुलांच्या भविष्याबद्दल मी चिंतेत आहे. अशा प्रकारचा गणवेश मुलांना विचलित करू शकतो. यापासून मुलांना वाचवायचं असेल तर या शाळेतून मुलांना काढून दुसऱ्या शाळेत घालावं लागेल.
लॅथम पुढे म्हणाले की, जर शाळेचा गणवेश असा ठरवत असाल तर यामुळे मुलांचं भविष्य धोक्यात आहे. मुलांना शिकण्यासारखं वातावरण वर्गात मिळणार नाही. यावर पॅनलिस्ट अन्ना वान होक यांनी म्हटलं की, आम्हीपण मुलांच्या भविष्याचा विचार करत आहोत आणि नवीन गणवेशात मुलींचं शरीर दिसेल असं काही नाही, आम्ही सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे.
हेही वाचा:
VIDEO: शरयू नदीतच महिलेचे जबरदस्त ठुमके; व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त, म्हणाले...