Trending News : ITBP जवानानं गायलं आफरीन गाणं; आवाजानं जिंकलं नेटकऱ्यांचे मन
जवानाचा हा गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Trending News : आपल्या देशाचे सैनिक सीमेवर शत्रूसोबत लढतात. दहशतवादी आणि शत्रूपासून देशाच्या नागरिकांचे रक्षण करणारे देशाचे शूर जवान हे वेगवेगळ्या कला देखील शिकत असतात. कधी गाणी गात असतानाचे तर कधी नृत्य सादर करतानाचे व्हिडीओ जवान सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतेच ITBP च्या एका जवानानं प्रसिद्ध गायक नुसरत फतेह अली खान (Nusrat Fateh Ali Khan) यांचे एक सुपरहिट गाणे गायले. जवानाचा हा गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
भारत-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या (ITBP) ट्विटर अकाऊंटवरुन वेगवेगळे व्हिडीओ शेअर केले जातात. या अकाऊंटवरुन नुकातच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कॉन्स्टेबल विक्रमजीत सिंह हे राहत फतेह अली खान यांचे आफरीन-आफरीन हे गाताना दिसत आहेत. तर कॉन्स्टेबल ए. नेली हे गिटार वादन करताना दिसत आहेत. 'गाणं गाणारे हिमवीर. आफरीन आफरीन... आयटीबीपीचे कॉन्स्टेबल विक्रम जीत सिंह गातात. कॉन्स्टेबल ए.नेली हे गिटार वाजवून त्यांची साथ देत आहेत.' असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी विक्रम जीत सिंह यांच्या आवाजाचे कौतुक केले आहे.
पाहा व्हिडीओ:
गाते गुनगुनाते हिमवीर
— ITBP (@ITBP_official) June 30, 2022
Afreen afreen...
Constable Vikram Jeet Singh of ITBP sings. Constable A Neli strums the Guitar.#Himveers pic.twitter.com/p69oxBe6us
व्हिडीओवर लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव
चार हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहेत. ITBP च्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका नेटकऱ्यानं या व्हिडीओवर कमेंट केली, 'खूप छान आवाज आहे.',तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'जय हिंद'. नुसरत फतेह अली खान आणि मोमिना मुस्तेहसान यांनी गायलेल्या आफरीन या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या गाण्याला युट्यूबवर 2.8 मिलियन नेटकऱ्यांनी लाइक केलं आहे.
विक्रमजीत सिंह यांचा 'अब तुम्हारे हवाले वतन साथीयों...' या गाण्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. विक्रमजीत सिंह हे त्यांच्या आवाजानं अनेकांची मनं जिंकत आहेत.
हेही वाचा: