Video : व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल! शेकडो फूट उंचीवर सेफ्टीशिवाय काम करतोय कामगार; सोशल मीडियावर संताप
Shocking Viral Video : इमारतीचं काम करत असताना कामगार मोठ्या उंचीवर उभा आहे. हे काम करत असताना तो कोणत्याही सुरक्षा हार्नेसशिवाय उभा आहे.
![Video : व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल! शेकडो फूट उंचीवर सेफ्टीशिवाय काम करतोय कामगार; सोशल मीडियावर संताप laborer seen without any harness at height during construction work of building marathi news Video : व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल! शेकडो फूट उंचीवर सेफ्टीशिवाय काम करतोय कामगार; सोशल मीडियावर संताप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/6f58056936a99c23cd3078f4d79d16b21673694361124358_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shocking Viral Video : आजकाल आपल्याला सोशल मीडियावर असे व्हिडीओ अनेकदा पाहायला मिळतात, जे त्यांच्या मनोरंजक कंटेंटमुळे यूजर्सचं मन जिंकतात. तर, काही वेळेला असे व्हिडीओ समोर येतात जे आपल्याला अगदी थक्क करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
खरं तर आपल्या देशात अनेकदा मजुरांच्या जीवाशी खेळ होताना दिसतात. त्यामुळे अनेक मजुरांचा कामादरम्यान अपघात होऊन जीवही गमवावा लागतो. सध्या सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये असेच दृश्य पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये छोटीशी चूकही मजुराच्या जीवावर बेतू शकते.
पाहा व्हिडीओ :
He needs appreciation and all praise… pic.twitter.com/fVcUqsJFIC
— Dr Showkat Shah (@shahshowkat07) January 8, 2023
उंचीवर काम करणारा कामगार
हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करून यूजर्स आपला संताप व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ डॉक्टर शौकत शाह नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक कामगार इमारत बांधण्याचे काम करताना दिसतोय. या इमारतीचं काम करत असताना तो मोठ्या उंचीवर उभा आहे. हे काम करत असताना तो कोणत्याही सुरक्षा हार्नेसशिवाय उभा आहे.
व्हिडीओला 14 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जे पाहून यूजर्सकडून संताप व्यक्त होत आहे. अशा प्रकारे कामगारांकडून काम करून घेणं म्हणजे जीवावर बेतण्यासारखंच आहे. वृत्त लिहेपर्यंत या व्हिडीओला सोशल मीडियावर 14 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 4 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना यूजर्स म्हणत आहेत की, या मजुराचा जीव कधीही जाऊ शकतो. त्याच वेळी, इतर यूजर्स मजुराच्या धैर्याला सलाम करत आहेत आणि त्याचे कौतुक करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)