Viral Video : रिक्षाखाली दबलेल्या आईसाठी लेक बनली आदिमाया-आदिशक्ती; मुलीने एकटीनेच रिक्षा उचलली
Viral Video : कर्नाटकच्या मंगळुरू येथील किन्नीगोली भागातील घटनेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे
Viral Video : बंगळुरू : आई अन् लेकीच्या नात्याचं वर्णन शब्दात करता येणार नाही, कारण लेकीसाठी आई जीवाचं रान करत असते. तर, आईसाठी लेकही जीवाची बाजी लावते. एका रस्ते अपघातातून लेकीनं आईसाठी केलेली धावपळ पाहून नेटीझन्सने या शाळकरी मुलीचं कौतुक केलंय. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून रस्ते अपघातात एका ऑटोरिक्षाखाली चेंबलेल्या आईला वाचविण्यासाठी लेकीनं धावाधाव केली. विशेष म्हणजे, रिक्षाचे वजन आपल्याला पेलेल का, रिक्षा आपल्याला उललली जाईल का, ह्या प्रश्नांचा कुठलाही विचार न करत आपली सर्वशक्ती पणाला लावली अन् आईच्या अंगावर पडलेली रिक्षा बाजूला केली. त्याचवेळी, बाजूला असलेल्या काही स्थानिकांनीही मदतीसाठी धाव घेतल्याचं या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.
कर्नाटकच्या मंगळुरू (Karnataka) येथील किन्नीगोली भागातील घटनेचा हा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ट्यूशन क्लासवरुन आपल्या मुलीला आई घरी घेऊन येत असताना हा अपघात झाला, यावेळी रस्ता ओलांडताना पाठिमागून जोरदार वेगाने आलेल्या रिक्षाचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मुलीची आई रिक्षाखाली आली होती. विशेष म्हणजे रिक्षा पूर्णपणे मुलीच्या आईच्या (Mother) अंगावर पडली होती. मात्र, आईच्या अंगावर पडलेली रिक्षा पाहताच लेकी वाघीणीसारखी धावत गेली. आदिमाया, आदिशक्तीप्रमाणे लेकीने आपल्या दोन्ही हातांनी रिक्षा उचलण्याचा प्रयत्न केला. जोर लावून तिने रिक्षा उचलली देखील, तितक्यात बाजुलाच असलेल्या स्थानिकांनी धावाधाव करत आईला रिक्षाखालून बाजूला काढले. सुदैवाने तत्परता दाखवल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. अपघातात आईला किरकोळ जखम झाली आहे. मात्र, आईसाठी लेकीनं केलेल्या धावपळीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. नेटीझन्सकडून मुलीचं जोरदार कौतुक केलं जातंय. सदरील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून रिक्षाच्या धडकेत आई जमिनीवर कोसळली आणि तिच्या अंगावर रिक्षा पडल्याचं पाहायला मिळतंय. मात्र, तत्काळ वाघीणीच्या वेगाने लेक धावत येऊन आपलं हत्तीचं बळ लावत आईच्या अंगावर पडलेली रिक्षा बाजुला करते.
दरम्यान, सोशल मीडियावर या लेकीच्या कृत्याचं आणि प्रसंगावधानतेचं कौतुक हतो आहे, गेल्या नेटीझन्सकडून मुलीने आईसाठी केलेली धडपड आणि आई-लेकीमधील नात्याचे बंध यांचं वर्णन करत लेकीला सॅल्यूटही केला जातोय. तसेच, ही शाळकरी मुलगी कौतुकास पात्र असल्याचंही बोललं जातंय.
That girl deserves appreciation 🙌👏 pic.twitter.com/TO22oHk78m
— 👑Che_ಕೃಷ್ಣ🇮🇳💛❤️ (@ChekrishnaCk) September 8, 2024
हेही वाचा
आधी गैरहजेरीवरुन उलटसुलट चर्चांना उधाण, नंतर अजितदादांनी अमित शाहांच्या भेटीसाठी थेट एअरपोर्ट गाठलं
That girl deserves appreciation 🙌👏 pic.twitter.com/TO22oHk78m
— 👑Che_ಕೃಷ್ಣ🇮🇳💛❤️ (@ChekrishnaCk) September 8, 2024