Republic Day : 'कर चले हम फिदा...', प्रजासत्ताक दिनी ITBP जवानाने गायलं गाणं, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Republic Day 2022 : देशभरात इंडो-तिबेटन बॉर्डर (ITBP) जवानांकडून विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. ITBP जवानाने देशवासियांना समर्पित करण्यासाठी गाणं गायलं आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Republic Day 2022 : देशभरात इंडो-तिबेटन बॉर्डर फोर्स (ITBP) चे जवानांकडून विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर देशवासियांसोबत शेअर करत आहेत. हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. ITBP ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांच्या प्रचंड पसंतीस उतरला आहे. व्हिडिओमध्ये, दोन ITBP जवान देशभक्तीपर गाण्यांवर शानदार परफॉर्मन्स देत आहेत.
या व्हिडीओमध्ये एक ITBP जवान 'अब तुम्हारे हवाले वतन साथीयों...' हे गाणे गात आहे. यामध्ये एका दुसऱ्या जवानाने गिटार वाजवत साथ दिली आहे. गाणं गाणार्या कॉन्स्टेबलचे नाव विक्रमजीत सिंह आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त या सैनिकांनी हे गाणे देशवासियांना समर्पित केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे सुंदर सादरीकरण लोकांना खूप आवडते. 1962 मध्ये भारत-चीन युद्धानंतर 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या हकीकत चित्रपटातील हे गाणे लोकांना खूप आवडले होते. त्यामुळेच देशप्रेमाने भरलेले हे गाणे आजही देशवासियांच्या मनात विशेष स्थान निर्माण करुन आहे.
कर चले हम फिदा जानो तन साथियों,
— ITBP (@ITBP_official) January 26, 2022
अब तुम्हारे हवाले वतन साथियों...
Constable Vikram Jeet Singh of ITBP sings on #RepublicDay2022 #RepublicDay #Himveers pic.twitter.com/DhEoDnKzPR
या प्रसिद्ध गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार कैफी आझमी यांनी लिहिले आहेत. त्याचवेळी हे गाणे मोहम्मद रफी यांनी आपल्या आवाजाने सजवले होते. धर्मेंद्र, बलराज साहनी, संजय खान यांच्यासह इतर कलाकारांवर चित्रित झालेल्या या गाण्याला मदन मोहन यांनी संगीत दिले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की यावेळी ITB प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरा करत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Republic Day 2022 : ITBP जवानांनी उणे 30 अंश तापमानात साजरा केला प्रजासत्ताक दिन, 15 हजार फूट उंचीवर फडकवला तिरंगा
- Republic Day : भारताच्या लष्करी सामर्थ्यापासून ते सांस्कृतिक विविधतेपर्यंत, जाणून घ्या परेडशी संबंधित 10 महत्त्वाच्या गोष्टी
- प्रजासत्ताक दिनाआधी भारताला श्रीलंकेकडून मोठी भेट, 56 भारतीय मच्छीमारांची सुटका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha