(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : अंजू आणि नसरुल्ला यांचा आणखी एक व्हिडीओ पाकिस्तानमधून समोर, जेवणाच्या टेबलावर अंजू दिसली बुरख्यात
पाकिस्तानी पत्रकाराने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात अंजू आणि तिचा पती नसरुल्ला हे त्याच्या मित्रांसोबत एका टेबलवर जेवण करताना दिसत आहेत.
Viral Video : भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने नुकताच इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मंगळवारी मित्र म्हणून सांगणाऱ्या नसरुल्लासोबत तिने लग्न देखील केले आहे. आत्तापर्यंत दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. आज एक व्हिडीओ समोर आला आहे. पाकिस्तानी पत्रकाराने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात अंजू आणि तिचा पती नसरुल्ला हे त्याच्या मित्रांसोबत एका टेबलवर जेवण करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये अंजू बुरखा घालून जेवण करताना दिसत आहे.
کیا پشتون گھروں میں یے رواج بھی ہے کہ تمام دوستوں کے سامنے اپنی بیوی کو پیش کرکے ٹک ٹاک بناکر ویوز بھٹورے جائیں یے سب مایا جلدی مشہور ہونے کی ہے کیا سیما کسی مردوں کے ھجوم میں تھی؟ نصراللہ کو کون استعمال کررہا ہے؟#Nasrullah #Anju #AnjuNasrullahLoveStory #Anjuinpakistan pic.twitter.com/8KaOY8fEi0
— Dileep kumar khatri🦚 (@DileepKumarPak) July 26, 2023
एकिकडे पाकिस्तानी महिला सीमा हैदर ही तिच्या मुलांसह प्रेमाखातर ग्रेट नोएडाला पोहोचली. त्याचवेळी राजस्थानमधील (Rajasthan) अलवर जिल्ह्यातील भिवडी येथील अंजू ही प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात पोहोचली. लाहोरमध्ये राहत असलेल्या प्रियकराला भेटण्यासाठी तिने पाकिस्तान गाठलं आणि आता दोन दिवसांपूर्वी अंजू आणि तिचा पती नसरुल्ला फिरायला गेले होते. त्या संबंधित देखील अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर आले होते. ते फिरायला गेले त्यावेळी त्यांच्या सुरक्षेकरता मोठा बंदोबस्त करण्यात आला होता.अंजूचा प्रियकर नसरुल्ला खैबर हा पाकिस्तानमधील पख्तूनख्वाच्या दीर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. अंजू आणि नसरुल्लाह यांची फेसबुकवर मैत्री झाली आणि दोघेही तासनतास सोशल मीडियावर बोलू लागले यानंतर अंजूने नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानला जायचं ठरवलं आणि ती थेट पाकिस्तानात पोहोचली. अंजूने पाकिस्तानात जाऊन स्वत:चे नाव फातिमा असे ठेवले आहे. धर्मांतरण करून तिने आता विवाह देखील केला आहे. या प्रकारामुळे तिचे वडील संतापले असून अंजू आमच्यासाठी मेली आहे, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या फेसबुकवर भेटलेल्या मित्राला भेटण्यासाठी अलवर येथील अंजू नामक महिला पाकिस्तानात गेली आहे. विशेष म्हणजे अंजूला एक 15 वर्षाची मुलगी आणि एक 5 वर्षाचा मुलगा आहे. अंजूने आपल्या कुटुंबीयांना कोणीही त्रास देऊ नये, असे आवाहन तिने एका व्हिडिओतून केले आहे.
व्हिजिट व्हिसाद्वारे अंजू गेली पाकिस्तानात
अंजूच्या पासपोर्टवरील नोंदीवरून, ती 21 जुलैला व्हिजिट व्हिसावर पाकिस्तानला पोहोचल्याची माहिती समोर आली होती. भारतीय महिला पाकिस्तानात पोहचल्याने पाकिस्तानी एजन्सी त्यादरम्यान अलर्ट झाली होती. अंजू पाकिस्तानात का आली, याबाबत पाकिस्तानी यंत्रणेकडून चौकशी देखील करण्यात आली होती. अंजूने नसरुल्लाह याला भेटण्यासाठी आल्याचं सांगितले होते. नसरुल्लाह हा दीर जिल्ह्यात मेडिकल रिप्रेझेनटेटिव्ह म्हणून काम करतो.
इतर महत्वाच्या बातम्या