एक्स्प्लोर

Maharashtra ATS: ISIS संबंध प्रकरणी रत्नागिरीनंतर आता गोंदियातून एकजण ताब्यात; महाराष्ट्र ATS ची कारवाई

Gondia News: दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणावरून गोंदियातून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. रत्नागिरीतूनही एकाला आधीच ताब्यात घेण्यात आले आहे.

Maharashtra ATS:  महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने आज मोठी कारवाई केली आहे. पुण्यात आयसिसशी (ISIS) संबंधित असलेल्या दोघांना अटक केल्यानंतर राज्यभरात एटीएसने (ATS) कारवाई सुरू केली आहे. पुण्यातील दहशतवाद्यांचे धागेदोरे गोंदियापर्यंत (Gondia) पोहचले आहेत. रत्नागिरीतून एकाला ताब्यात घेतल्यानंतर एटीएसने गोंदियातून एकाला ताब्यात घेतले आहे. अब्दुल कादिर पठाण (वय 35)  असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, आयसिसशी संबंध असल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पाच जणांना अटक केली आहे.

गोंदियातील रामनगर येथील 35 वर्षीय अब्दुलला पुणे पोलिसांनी गोंदिया पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. संशयिताला एटीएसने चौकशीसाठी पुण्यात नेले. पुण्यात या तरुणाची कसून चौकशी सुरू आहे.  संशयिताबाबतची माहिती पुणे गुप्तचर यंत्रणेची माहिती गोंदिया पोलिसांना मिळाली. गोंदियाच्या पोलिसांनी आणि गुप्तचर यंत्रणेने त्या 35 वर्षाच्या तरुणाचे घर गाठून त्याला ताब्यात घेत पुण्याला रवाना केले. यासंदर्भात गोंदियाचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी नागरिकांना आवाहन करत या घटने संदर्भात कुठल्याही अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे. 

रत्नागिरीतून एकजण ताब्यात

दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांवरुन पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन संशयितांना अटक केली होती. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने आता रत्नागिरीतील एका व्यक्ती चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.  या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचं आढळल्यास त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असं अधिकाऱ्याने नमूद केले आहे.

गस्तीदरम्यान दोन अतिरेकी अटकेत, एक जण पळून जाण्यात यशस्वी

मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ या दोन दहशतवाद्यांना मागील सोमवारी मध्यरात्री गस्तीवर असलेल्या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सनी संशयास्पद हालचाली जाणवल्याने पकडले. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम हा यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाला. अटकेतील दोघांना 5 ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

दोन संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीतून अनेक नावं समोर

दरम्यान महाराष्ट्र एटीएसने अलिकडेच (22 जुलै) पुण्यात अटक केलेल्या दोन संशयित दहशतवादी प्रकरणाचा तपास हाती घेतला. तपासादरम्यान दोघांच्या चौकशीतून आणखी काही लोकांची नावं समोर आली आहेत. त्यानंतर एटीएसच्या पथकाने अनेकांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे, असंही अधिकाऱ्याने पुढे सांगितलं.

वॉण्टेड दहशतवाद्यांवर एनआयएकडून इनाम

तत्पूर्वी या तीनही दहशतवाद्यांनी राजस्थानमधील जयपूर इथे घातपात करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) त्यांचा शोध घेत होती. एनआयएने मोहम्मद शहनवाज आलम याच्यावर पाच लाख रुपयांचे इनाम देखील जाहीर केले आहे. हे दोघं 15 महिन्यांपासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते.

इतर महत्त्वाची बातमी:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चाShaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget