(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जपानमध्ये पती-पत्नी एकत्र झोपत नाहीत, कारण ऐकून चकित व्हाल
Couples Sleep Separately in Japan : विविध देशांमधील संस्कृती आणि विचारधारा वेगळी असते. देशानुसार सामाजिक संस्कृती बदलते. तसेच एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक विचारधारेचा देखील यावरदेखील प्रभाव टाकू शकतो.
Husband Wife Sleep Separately : लग्नानंतर व्यक्तीचं आयुष्य बदलतं असं म्हटलं जातं. लग्नानंतर नवरा-बायको एकाच छताखाली राहतात, त्याचं आयुष्य एकमेकांवर अवलंबून असतं. लग्नाआधी नवरा-बायको दोघांचीही लाईफस्टाईल वेगळी असते पण, लग्नानंतर सर्व काही बदलून जातं. भारतातील संस्कृती आणि विचारधाराही वेगळी आहे. भारतात लग्नानंतर नवरा-बायको एका छताखाली एकत्र राहतात, झोपतात. पण जपानमध्ये लग्नानंतर नवरा-बायको वेगवेगळे झोपतात.
जपानमध्ये पती-पत्नी एकत्र झोपत नाहीत
जपानमध्ये नवरा-बायको एकत्र झोपत नाहीत. आता तुम्हाला वाटत असेल की, जपानमध्ये जोडप्याचं एकमेकांवर प्रेम नाही, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. याचं एकमेकांवर प्रेम आहे, मात्र तरीही ते वेगवेगळे झोपतात. यामागचं कारण वेगळं आहे. यामुळे नवरा-बायकोंमधील प्रेम घट्ट होत असं सांगितलं जातं.
फक्त 29 टक्के जोडपे एकत्र झोपतात
टोकियो फॅमिलीजच्या रिपोर्टनुसार, जपानी गोरमेट वेबसाइट गाइड, गुरुनवीने 2017 मध्ये यासंदर्भात एक सर्वेक्षणही केलं होतं. या सर्वेक्षणात आढळलं की, 20 ते 69 वयोगटातील सुमारे 1662 जोडप्यांचा समावेश होता. त्यापैकी फक्त 29.2 टक्के जोडपी एकाच बेडवर झोपायचे. इतर अनेक अहवालांनुसार, झोपण्याच्या या पद्धतीमागे तीन मुख्य कारणं आहेत. जाणून घ्या यामागचं कारण.
झोपण्याची आणि उठण्याची वेगळी वेळ
जपानमधील जोडप्यांना एकमेकांची झोप खराब करायची नाही. एकत्र झोपल्यानंतर एखाद्याला आधी उठावं लागलं तर त्यामुळे जोडीदाराची झोप मोडू शकते. त्यामुळे कपल्स स्वतंत्रपणे झोपून पुरेशी झोप घेऊ शकतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप अतिशय महत्त्वाची आहे, यावर त्यांचा विश्वास आहे.
चांगली आणि पुरेशी झोप आवश्यक
वेगळे झोपणाऱ्या जोडप्यांमध्ये प्रेम नसतं असं जरी तुम्हाला वाटत असले तरी जपानमध्ये याकडे दर्जेदार झोपेच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. जपानमधील जोडप्यांना त्यांच्या जोडीदाराची झोप मोड होऊ नये असं वाटतं. या कारणास्तव हे कपल्स वेगवेगळे झोपतात. काही वेळेस नवरा-बायको दोघांच्या झोपेच्या सवयी वेगळ्या असतात. यामुळे जोडीदाराच्या झोपेत व्यत्यय येऊ नये म्हणून काही कपल्स वेगळे झोपतात.
मुलं आईसोबत झोपतात
जपानमध्ये बहुतेक मुलं त्यांच्या आईसोबत झोपतात. यासोबतच मुलांच्या हृदयाचे ठोके नियंत्रित राहतात. यावेळी आई आणि मुलासोबत झोपायचं की वेगळे, हा निर्णय वडिलांचा असतो.
वैयक्तिक मतही आवश्यक
देशानुसार सामाजिक संस्कृती बदलते. तसेच एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक विचारधारेचा देखील यावरदेखील प्रभाव टाकू शकतो. त्यामुळे अनेक जपानी घरांमध्ये पती-पत्नी एकाच खोलीत झोपत नाहीत. पती-पत्नीने रात्री एकत्र झोपणे हे देखील जपानमध्ये सामान्य आहे, पण यामध्ये काही वैयक्तिक मतांचा देखील परिणाम होतो. जर कोणाला वेगळं झोपायचे असेल तर तो झोपू शकतो.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )