एक्स्प्लोर

हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलिवुड हे नाव कसं पडलं? बॉलिवुड, हॉलिवुड आणि टॉलिवुड... यामधील 'वुड'चा अर्थ काय?

History of Bollywood : अमेरिकन फिल्म इंडस्ट्री म्हणजेच हॉलिवूडचे नाव 1930 पर्यंत जगभर प्रसिद्ध झाले होते. तोपर्यंत भारतातील चित्रपटसृष्टी फक्त हिंदी चित्रपट उद्योग या नावानेच ओळखली जात होती. हे बॉलीवूड कसे बनले ते जाणून घ्या

History of Hollywood : हिंदी चित्रपटसृष्टी 'बॉलिवुड' (Bollywood) या नावाने, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी 'टॉलिवुड' (Tollywood) या नावाने आणि अमेरिकन फिल्म इंडस्ट्री 'हॉलिवूड' (Hollywood) नावाने ओळखली जाते. बॉलिवुड (Bollywood), हॉलिवुड (Hollywood) आणि टॉलिवुड (Tollywood) या शब्दांमध्ये 'वुड' हा शब्द समान आहे. फक्त अमेरिकाच नाही तर, भारतातही वेगवेगळ्या भाषांच्या चित्रपटसृष्टीतही 'वुड' हा शब्द असणे सर्वसामान्य आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, चित्रपटसृष्टीला नावे कशी मिळाली आणि यातील 'वुड' शब्दाचा अर्थ नक्की काय आहे?

अमेरिकन चित्रपटसृष्टी हॉलिवुडपासून (Hollywood) प्रेरणा घेत इतर चित्रपटसृष्टीने आपल्या नावामध्ये 'वुड' शब्दाचा वापर करुन  त्या-त्या फिल्म इंडस्ट्रीचे नामकरण केले. फक्त भारताच नाही पाकिस्तानमध्येही चित्रपटसृष्टीचं नामकरण अशाच प्रकारे करण्यात आले आहे. तेथेही  'वुड' शब्दाचा वापर करण्यात आला आहे. याची सुरुवात कशी झाली जाणून घ्या.

How Did Hollywood Get its Name : हॉलिवुड हे नाव कसं पडलं? 

रिअल इस्टेट व्यावसायिक एच.जे. व्हिटली (H.J. Whitley) यांना हॉलिवूडचे पिता (Father of Hollywood) म्हटले जाते. त्यांनीच अमेरिकेच्या चित्रपटसृष्टीला 'हॉलिवूड' हे नाव दिले. 'हॉलीवूड' हे अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहराच्या मध्यवर्ती भागातील एका ठिकाणाचे नाव आहे. व्हिटली यांनी 'हॉलीवूड' हे ठिकाणाचे नाव तेथील चित्रपटसृष्टीला दिले. कालांतराने इथल्या चित्रपटांना इतर देशांमध्ये प्रसिद्धी मिळाली आणि हॉलिवूडचं नाव जगभरात गाजलं. हॉलिवूडमध्ये आजही अनेक ऐतिहासिक स्टुडिओ आहेत.

How Did Bollywood Get its Name : बॉलिवुड हे नाव कसं पडले?

बॉलीवुड हा शब्द हा 'बॉम्बे' या शब्दापासून आला आहे आणि त्याच्यापुढे हॉलीवुड शब्दामधील वुड हा शब्द वापरण्यात आला आहे. अशा प्रकारे हिंदी चित्रपटांसाठी बॉली आणि वूड असा मिळून बॉलिवुड शब्द प्रचलित झाला. त्याकाळात मुंबईला बॉम्बे नावाने प्रसिद्ध होती आणि इथे चित्रपट बनायचे, म्हणून बॉलीवूडमध्ये 'ब' अक्षराला प्राधान्य देऊन बॉलिवुड हे नाव ठेवण्यात आले. जगभरात 70 च्या दशकापर्यंत बॉलिवुड हे नाव प्रसिद्ध झाले.

जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटांना बॉलिवुड म्हटले जाते पण हे नाव अधिकृत नाही. 'बॉलिवूड' हा शब्द संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी नसून फक्त मुंबईतील चित्रपटसृष्टीसाठी आहे. पण बॉलिवुड हे नाव आता जगभरात लोकप्रिय झाले आहे. 

अशा प्रकारे 'वुड' भारतात पोहोचले

1930 पर्यंत अमेरिकन चित्रपटसृष्टी म्हणजेच 'हॉलिवूड'चे नाव जगभर प्रसिद्ध झाले होते. तोपर्यंत भारतातील चित्रपटसृष्टी फक्त हिंदी चित्रपट उद्योग या नावाने ओळखली जात होती. याला बॉलीवूड हे नाव मिळण्याचे श्रेय बंगाली चित्रपटांना द्यायला हवे, असेही म्हटले जाते. 1930 साली कोलकात्याचा बंगाली चित्रपट उद्योग 'टॉलीगंज' नावाच्या परिसरात होता. ज्युनियर स्टेट्समन नावाच्या मासिकाने पहिल्यांदाच याबद्दल लिहिताना 'टॉलिवूड' हा शब्द वापरला. पण, आजच्या काळात दाक्षिणात्य चित्रपटांसाठी टॉलिवूड हा शब्द वापरला जातो.

महत्त्वाच्या इतर बातम्या

'एक चुम्मा तु मुझको...', जगातील सर्वात पहिलं Kiss कुणी, कुठे आणि का केलं, माहितीय? वाचा रंजक माहिती...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Justice KU Chandiwal : Sachin Waze यांनी शपथपत्रानुसार साक्षीपुरावे दिले असते तर उलगडा झाला असताTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAsauddin Owaisi on PM Modi:भाजपच्या 'एक हैं तो सैंफ है'ला ओवैसींचं उत्तर;म्हटले अनेक हैं तो अखंड हैंABP Majha Headlines :  8 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
राज ठाकरेंच्या विक्रोळीतल्या सभेत संजय राऊतांसाठी 'रिकामी खुर्ची'; मनसैनिकांनी धाडलेलं आग्रहाचं निमंत्रण, कारण काय?
राज ठाकरेंच्या विक्रोळीतल्या सभेत संजय राऊतांसाठी 'रिकामी खुर्ची'; मनसैनिकांनी धाडलेलं आग्रहाचं निमंत्रण, कारण काय?
Amit Shah: मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही, टर्म संपायच्या आत आधी बांगलादेशी-रोहिंग्यांना वेचून बाहेर काढू: अमित शाह
अमित शाहांचं मोठं आश्वासन, ही टर्म संपायच्या आधी मुंबईतून एक-एकाला वेचून बाहेर काढू
Tulsi Vivah 2024 Wishes : तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर मित्र-मंडळी, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर मित्र-मंडळी, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
Juhi Chawla Birthday:   90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
 90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
Embed widget