'एक चुम्मा तु मुझको...', जगातील सर्वात पहिलं Kiss कुणी, कुठे आणि का केलं, माहितीय? वाचा रंजक माहिती...
Kiss History : चुंबन (Kiss) आणि प्रेमाचे गहण नातं आहे. चुंबन घेणे ही जणू प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. विशेषत: ओठांवर चुंबन घेणे हे प्रेमाचं प्रतिक बनलं आहे.
Kiss History : चुंबन (Kiss) आणि प्रेमाचे (Love) गहण नातं आहे. चुंबन घेणे ही जणू प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बनली आहे. विशेषत: ओठांवर चुंबन घेणे हे प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. जगात सर्वात पहिलं चुंबन (Kiss) कुणी घेतलं आणि का असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे. किसची सुरुवात फ्रेंच जोडप्यापासून झाली असावी, असे म्हटले जाते. तर किसची सुरुवात भारतातून सुरू झाले आणि त्यानंतर हे जगभर पसरलं, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
किस करण्याला सुरुवात कशी झाली?
चुंबन घेणे म्हणजे किस करण्याला सुरुवात कशी आणि कुठून झाली असावी याबद्दल शास्त्रज्ञांकडून वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले आहेत. बहुतेक शास्त्रज्ञांच्या मते, जगातील सर्वात पहिलं चुंबन (Kiss) एक अपघात झाला असावा. हा अपघात लोकांना आवडला आणि त्यानंतर किस घेणे प्रचलित झालं, असं म्हटलं जातं.
जगातील सर्वात पहिली Kiss कुणी केलं?
काही शास्त्रज्ञांच्या मते, किस करण्याची पद्धत प्राण्यापासून आलेली असावी, असं म्हटलं जातं. काही प्राणी त्यांच्या मुलांना तोंडाद्वारे अन्न भरवतात. जनावरेही अन्नाचे किंवा धान्य-फळांचे तुकडे थेट मुलांच्या तोंडात टाकत नाहीत, तर चघळलेले तुकडे तोंडात भरवतात. याला प्रीमॅस्टिकेशन फूड ट्रान्सफर म्हणतात. यापासूनच मानवामध्ये चुंबन प्रचलित झालं असावे, असे काहीचं मत आहे. चिंपांझी प्राणी असेच करतात. चिंपांझी आपल्या मुलांना त्यांचा सांभाळताना त्यांचे चुंबन घेतात. त्यामुळे आपण आपल्या पूर्वजांकडून मानव चुंबन घेण्यास शिकलो, असंही काही तज्ज्ञांचे मत आहे.
तसेच, काही जनावरेही अन्नाचे किंवा धान्य-फळांचे तुकडे थेट मुलांच्या तोंडात टाकत नाहीत, तर चघळलेले तुकडे तोंडाला दिले जायचे. याला प्रीमॅस्टिकेशन फूड ट्रान्सफर म्हणतात. पक्षांमध्येही असे पाहायला मिळते. पक्षी त्यांच्या पिल्लांना चोचीमध्ये अन्न भरवतात. याचाही चुंबन घेण्याशी संबंध असू शकतो.
शास्त्रज्ञांच्या आणखी एक सिद्धांतानुसार चुंबन अपघातामुळे झाले असावे. टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीच्या मानववंश शास्त्र विभागाने यावर संशोधन केले आहे. या संशोधनानुसार, मानव एकमेकांच्या जवळ जाऊन वास घेण्याचा प्रयत्न करत असताना अपघाताने त्यांनी एकमेकांचे चुंबन घेतले असावे, असा दावा करण्यात आला आहे. या दाव्यात तथ्य असल्याचे म्हटले जाते, कारण जुन्या काळी एकमेकांना भेटताना त्यांच्या वास घेण्याची प्रथा होती, असे म्हटले जाते. अनेक समाजांमध्ये, स्निफिंग म्हणजे वास घेणे ही अभिवादन करण्याची पद्धत होती. एकमेकांचा वास घेताना अचानक एका जोडप्याने चुंबन घेतले असावे. यानंतर कुतूहलापोटी चुंबन घेण्याची पद्धत प्रचलित झाली असावी, असा दावा करण्यात आला आहे.
काही शास्त्रज्ञांच्या मते, चुंबनाची अशी सुरुवात भारतात झाल्याचे म्हटले जाते. त्यानंतर प्राचीन ग्रीक लोक भारतात आले आणि परत जाताना त्यांनी चुंबन घेण्याची संकल्पना घेऊन त्यांच्यामार्फत ती जगभरात पसरली. किस करण्याचे अनेक प्रकार आहेत. यातील फ्रेंच किस सर्वात प्रचलित आहे. फ्रेंच लोकांनी याची सुरुवात केल्याचा दावा करण्यात येतो. पण इतर काही देशांनीही हा दावा केला आहे.
किस करण्यावर बंदी
रोमन सम्राट टायबेरियसने फ्रेंच किस म्हणजे ओठांवर चुंबन घेण्यास बंदी घातली होती. इजिप्तपासून इटली-जर्मनी आणि बेल्जियम-स्वित्झर्लंडपर्यंतचा मोठा भाग त्याच्या ताब्यात होता. या सर्व भागात चुंबन घेण्यावर बंदी घालण्यात आली होती. लैंगिक संक्रमित रोग पसरण्याच्या भीतीमुळे रोमन सम्राटाने ही बंदी घातली होती.