Hindi Diwas 2023: औरंगजेबाने बनवली होती हिंदीची पहिली डिक्शनरी; त्यात नेमकं असं काय होतं खास?
Aurangzeb Hindi Dictionary: मुघल काळात अनेक घटना घडल्या आहेत. क्रूर राजवट, सामान्य लोकांवर अत्याचार आणि बरंच काही. पण याच मुघल काळातील एका शासकाने हिंदी शब्दकोश बनवला होता, हे तुम्हाला माहीत आहे का?
Aurangzeb Hindi Dictionary: औरंगजेबाला (Aurangzeb) मुघल काळातील सर्वात क्रूर सम्राट म्हटलं जायचं. त्याला हवं ते सर्व त्याने साध्य केलं. त्याने आपल्या भावाचीही हत्या केली, वडिलांना तुरुंगात टाकलं. परंतु जेव्हा त्याच्या मुलांच्या संगोपनाचा प्रश्न आला, तेव्हा एक वडील म्हणून त्याने त्याच्या मुलांना पात्र बनवण्यासाठी सर्व काही केलं. याच वेळी औरंगजेबाने हिंदी शब्दकोश (Hindi Dictionary) देखील बनवला. त्याच्या या कामामागील मनोरंजक गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?
औरंगजेबाच्या शेवटच्या दिवसात त्याला त्याच्या कृत्यांचा इतका पश्चाताप होऊ लागला की त्याने स्वतःला पापी देखील म्हटलं आणि याच कारणामुळे औरंगजेबाला मुघल काळातील सर्वात गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व म्हटलं जातं, त्याला समजणं इतकं सोपं नव्हतं.
या कामाबद्दल औरंगजेबाचं झालं कौतुक
3 नोव्हेंबर 1618 रोजी जन्मलेला औरंगजेब, मुघलांचा सहावा सम्राट, याने अर्ध्या शतकाहून अधिक काळ भारतीय उपखंडावर राज्य केलं. मुघल साम्राज्य औरंगजेबच्या राजवटीत सर्वात जास्त विस्तारलं, सर्वात जास्त श्रीमंत देखील बनलं. औरंगजेबाची इतकी सर्व दुष्कृत्यं असूनही त्याने एक गोष्ट अशीही केली, जी कौतुकास्पद होती. औरंगजेबाने त्याच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं, यासाठी हिंदी-फारसी शब्दकोश बनवून घेतला, ज्याला 'तोहफतुल-हिंद' असं नाव देण्यात आलं होतं.
मुघलांनाही हिंदी शिकवण्यासाठी शब्दकोश
इतिहासकार ओम प्रकाश प्रसाद यांनी 'औरंगजेब, एक नवीन दृष्टी' या पुस्तकात अनेत तथ्य लिहिली आहेत. त्यात सांगितल्याप्रमाणे, औरंगजेबने हा शब्दकोश अशा प्रकारे तयार करुन घेतलेला की, फारसी भाषा जाणणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सहज हिंदी (Hindi) शिकता येईल. त्या शब्दकोशाची एक प्रत अलीकडेच पाटणाच्या प्रसिद्ध खुदाबक्ष खान ओरिएंटल लायब्ररीत ठेवण्यात आली आहे. औरंगजेब बादशाहने आपला तिसरा मुलगा आझम शाह याला हिंदी शिकता यावं म्हणून 'तोहफतुल-हिंद' हा शब्दकोश बनवला.
1674 मध्ये तयार करण्यात आला शब्दकोश
औरंगजेबाने मिर्झा खान बिन फखरुद्दीन मुहम्मद यांना शब्दकोश तयार करण्याचे आदेश दिले होते. यावर अनेक महिने काम झालं आणि मग 1674 मध्ये शब्दकोश तयार झाला. आजही त्याच्या अनेक प्रती पुस्तकालयांत (Library) मिळतात. औरंगजेबाने बनवलेल्या शब्दकोशात हिंदी आणि ब्रजभाषेतील शब्द वापरण्यात आले होते.
शब्दकोशात शब्दांच्या उच्चाराची पद्धत आणि नंतर त्यांचे फारसी अर्थ स्पष्ट केले आहेत. उदाहरणार्थ, चाफा फुलाचा अर्थ सांगताना- ते पिवळं फूल आहे, ज्यामध्ये किंचित सफेद रंग दिसतो, ज्या शब्दाचा उपयोग हिंदू कवी आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी वापरतात, असं लिहिलं गेलं आहे.
हेही वाचा:
ISRO Scientist Salary: इस्रोच्या प्रमुखांचा नेमका पगार किती? जाणून घ्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI