Viral Signature : 'हे तर साळिंदर'; मेडिकल कॉलेजमधील अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने मीम्स आणि जोक्सचा पाऊस
डॉक्टरांच्या हस्ताक्षरावर सातत्याने विनोद केले जातात. पण हे विनोद का बनतात याचं उत्तर गुवाहाटी मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याची स्वाक्षरी पाहून मिळू शकेल.
मुंबई : स्वाक्षरी किंवा सही ही एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असते, जी कागदावर त्याची ओळख बनते. तर बनावट स्वाक्षरीद्वारे फसवणूक करणाऱ्यांचाही तुटवडा नाही. परंतु जर एखाद्याची स्वाक्षरी गुवाहाटी मेडिकल कॉलेजमधील एका अधिकाऱ्यासारखी असेल तर तिथे बनावट सही करुन फसवणूक करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. या अधिकाऱ्याची स्वाक्षरी पाहिली तर त्याचं नाव काय असेल याचा अंदाजही लावता येणार नाही.
इंटरनेटवर सध्या ही अजब स्वाक्षरी व्हायरल होत आहे, ज्याची ना सुरुवात कळत ना शेवट. गुवाहाटी मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याची ही स्वाक्षरी आहे. या सहीची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगत आहे.
साळींदराच्या काट्यांसारखी सही
व्हायरल होणाऱ्या या स्वाक्षरीचा फोटो पाहून तुम्हाला काही क्षण साळींदर हा प्राणी नजरेसमोर आल्याशिवाय राहणार नाही. साळींदराचे काटे हे बिबट्यालाही जखमी करण्यास सक्षम असतात. ही स्वाक्षरी साळींदराच्या काट्यांसारखीच आहे. गुवाहाटी मेडिकल कॉलेज अॅड हॉस्पिटलच्या अस्थीरोग विभाग आणि रजिस्ट्राराच्या स्टॅम्पसह ही सही व्हायरल झाली आहे, ज्यावर 4 मार्च 2022 ही तारीख आहे.
रमेश नावाच्या एका युझरने स्वाक्षरीचा फोटो ट्विटरवर शेअर केल्यानंतर तुफान व्हायरल झाला. हा फोटो शेअर करताना ट्विटर युझरने म्हटलं आहे की, "मी माझ्या आयुष्यात याआधी अशी उत्कृष्ट स्वाक्षरी पाहिलेली नाही."
I have seen many signatures but this one is the best. pic.twitter.com/KQGruYxCEn
— Ramesh 🇮🇳 🚩 (@Ramesh_BJP) March 20, 2022
एक युझरने याची तुलना साळींदरासोबत केली आहे. तर अन्य युझरने लिहिलं आहे की कदाचित हा अधिकारी पेन टेस्ट करत असावा. आणखी एका युझरने म्हटलं आहे की, बँक व्हेरिफिकेशनमध्ये तो साळींदरासारख्या स्वाक्षरीचे काटे मोजत असावा. ही स्वाक्षरी करणाऱ्याला सिक्रेट सर्व्हिसमध्ये पाठवण्याचा सल्ला एका युझरने दिला. तर या अधिकाऱ्याची एक सही दुसऱ्या सहीसोबत मॅच होत नसेल, असं एकाने म्हटलं.
It looks like a procupine 😅 pic.twitter.com/JhdgvgVSwD
— Swapnil (@Unsubtle_og) March 21, 2022
Ask him to sign again & I am sure he will not be able match same number of loops. By the way what’s the name of this animal drawing lover.
— Deepak Bansal 🇮🇳 (@deepak_bansal11) March 21, 2022
I think he was checking if his pen is writing......maybe the last 2 lines must be his signature 🤔
— shobhith (@shobhith) March 20, 2022
वायरल चेक : बीड : अंबाजोगाईतील डॉक्टरच्या व्हायरल प्रिस्किप्शन मागचं नेमकं सत्य काय?