(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral : मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन बापानं गाठलं 10 किमी, 7 वर्षाच्या बालिकेची रुग्णवाहिकेअभावी फरफट?
Viral : अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलीची ऑक्सिजन पातळी 60 च्या आसपास होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलीला गेल्या काही दिवसांपासून ताप होता.
Viral Video : छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्यातील एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रशासनाचं दुर्लक्ष म्हणत लोक या घटेनवर संताप व्यक्त करत आहेत. तर रुग्णालयाने आरोप फेटाळले आहेत. छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टीएस सिंह देव यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
रुग्णवाहिकेअभावी फरफट?
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी लखनपूर गावात असलेल्या सामुदायिक आरोग्य केंद्रात एका मुलीचा मृत्यू झाला आणि रुग्णवाहिका तेथे पोहोचण्यापूर्वीच मुलीच्या वडिलांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा असे मृत्यू झालेल्या मुलीचं नाव असून ती आमदळा गावची रहिवासी आहे. सकाळी तिचे वडील ईश्वर दास यांनी त्यांच्या आजारी मुलीला लखनपूर सीएचसीमध्ये आणले.
Surguja: Chhattisgarh Health Min TS Singh Deo orders probe after video of a man carrying body of his daughter on his shoulders went viral
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) March 26, 2022
Concerned health official from Lakhanpur should have made the father understand to wait for hearse instead of letting him go, Deo said(25.3) pic.twitter.com/aN5li1PsCm
कमी ऑक्सिजन पातळीमुळे मृत्यू - रुग्णालय
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलीची ऑक्सिजन पातळी 60 च्या जवळ होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला गेल्या काही दिवसांपासून ताप होता. रुग्णालयात उपस्थित असलेले ग्रामीण वैद्यकीय सहाय्यक (आरएमए) डॉ. विनोद भार्गव यांनी सांगितले की, मुलीवर उपचार सुरू करण्यात आले होते, परंतु तिची प्रकृती आधीच खूप वाईट होती, त्यानंतर हळूहळू ती आणखीनच बिघडत गेली. यानंतर उपचारादरम्यान सकाळी साडेसातच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
त्यांनी सांगितले की, मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की लवकरच त्यांची घोडागाडी येईल आणि रुग्णवाहिका तेथे पोहोचण्यापूर्वीच मुलीच्या वडिलांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला. दुसरीकडे, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एकीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लोक संतप्त झाले आहेत. त्याचबरोबर या घटनेवर अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- धक्कादायक! 12 वर्षीय मुलगी अत्याचारानंतर गर्भवती, पालकांनी नराधमासोबतच लग्न लावलं, नागपूरमधील घटना
- Nanded : धक्कादायक! जन्मदात्या बापानेच केला मुलाचा गळा आवळून खून; गुन्हा दाखल, चार आरोपी ताब्यात
- मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर केमिकल टँकर पलटी, पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha