![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर केमिकल टँकर पलटी, वाहतूक कोंडीत टोल चालकांकडून लूट, ओला-उबेर चालकाचा आरोप
Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात केमिकल टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे एक्सप्रेसवेवर पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या लांबच लांग रांगा लागल्या आहेत.
Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात केमिकल टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला असून एक्सप्रेसवेवर पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या लांबच लांग रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर केमकील सांडल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ केमिकल टँकर पलटी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यंत्रणेकडून केमिकल आणि अपघातग्रस्त वाहन हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक लोणावळामार्गे वळवण्यात आली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एक केमिकल टँकर पलटी झाल्याने त्यामधून केमिकल वाहू लागले. रस्त्यावर केमिकल पसरल्याने अनेक वाहन घसरू लागली. दोन अवजड वाहन तर झाली. बोरघाटमध्ये पहाटे 5:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प होती. त्यानंतर आता ती लोणावळामार्गे वळवण्यात आली आहे. पुण्याकडील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. यंत्रणेकडून केमिकल आणि अपघातग्रस्त वाहन हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
वाहतूक कोंडीमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहन जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळविण्यात आली. पण या प्रसंगाचा फायदा घेत टोल चालकांकडून पैसे लाटले जात आहेत. ओला-उबेर चालकाने हे वास्तव व्हिडीओद्वारे समोर आणलंय. पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर टोल दिला असताना, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही सक्तीने टोल वसूल केला जातोय, असा आरोप या चालकाने व्हिडिओत केलाय.
#BREAKING वाहतूक कोंडीमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गे वळवली. याचा फायदा घेत टोल चालक पैसे उकळत असल्याचा आरोप ओला-उबेर चालकाने केलाय. पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर टोल दिला असताना, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही सक्तीने टोल वसूल केला जातोय, pic.twitter.com/Dps0MHCGt8
— ABP माझा (@abpmajhatv) March 26, 2022
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर केमिकल पसरल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. परिणामी मुंबईला जाणारी वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळविण्यात आलेली आहे. मात्र तिथं ही अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी झालीये. गेल्या सहा तासंपासून प्रवासी ताटकळत आहेत. हे सर्व प्रवासी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील 270 रुपयांचं टोल देऊन इथं पोहचलेत. मात्र पर्यायी मार्गावर आणखी टोल नाका आडवा आलाय.
सगळे प्रवासी वाहतूक कोंडीच्या संकटात फसले असताना इथे पुन्हा टोल आकारला जातोय. त्यामुळेच संतप्त झालेल्या ओला-उबेर चालकाने एक व्हिडिओ बनवला आणि टोल चालक संकटसमयी लूट करतायेत असा आरोप ही त्याने केलाय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Nanded : धक्कादायक! जन्मदात्या बापानेच केला मुलाचा गळा आवळून खून; गुन्हा दाखल, चार आरोपी ताब्यात
- धक्कादायक! 12 वर्षीय मुलगी अत्याचारानंतर गर्भवती, पालकांनी नराधमासोबतच लग्न लावलं, नागपूरमधील घटना
- Petrol Diesel Price Hike : इंधन दरात मागील 5 दिवसातील चौथी वाढ, पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागणार
- Anil Ambani : अनिल अंबानींचा मोठा निर्णय, आर-पॉवर आणि आर-इन्फ्रा संचालक पदाचा राजीनामा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)