एक्स्प्लोर

Fact : पृथ्वीवरील दिवस हळूहळू मोठा होतोय? चंद्रामुळे नेमकं काय घडतंय? शास्त्रज्ञ म्हणतात...

Earth : शास्त्रज्ञांच्या मते, चंद्र दरवर्षी सुमारे 3.82 सेमी वेगाने पृथ्वीपासून दूर जात आहे. नेमकं सत्य काय? जाणून घ्या

Fact News : पृथ्वीवरील (Earth) दिवस आणि रात्रीचा संपूर्ण खेळ तिच्या स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्यामुळे होतो. म्हणजेच पृथ्वी आपल्या अक्षाभोवती ज्या वेगाने फिरते त्यानुसार दिवस आणि रात्र होते. यासाठी चंद्र देखील काही प्रमाणात कारणीभूत ठरतो. काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की सुमारे 1.4 अब्ज वर्षांपूर्वी, पृथ्वीवरील दिवस फक्त 18 तासांचे होते. परंतु चंद्राचे (Moon) पृथ्वीपासूनचे अंतर जसजसे वाढत गेले तसतसे दिवसही मोठे होत गेले, ही प्रक्रिया अखंड चालू राहते.असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

पृथ्वीवरील दिवस मोठा होणार?
याविषयी, विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठातील भूविज्ञानाचे प्राध्यापक स्टीफन मेयर्स त्यांच्या अहवालात म्हणतात की, जेव्हा चंद्र पृथ्वीपासून दूर जातो, तेव्हा स्केटरवर फिरणाऱ्या पृथ्वीच्या भूजा पसरतात. त्यामुळे येथे दिवस मोठे होतात. विज्ञानाच्या भाषेत या प्रक्रियेला एस्ट्रोक्रोनोलॉजी असे म्हणतात. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की एस्ट्रोक्रोनोलॉजी मदतीने ते पृथ्वीच्या भूगर्भातील माहिती देखील मिळवू शकतात.

25 तासांचा दिवस असेल?
सध्या चंद्र दरवर्षी 3.82 सेमी वेगाने पृथ्वीपासून दूर जात आहे. ही एक सतत होणारी प्रक्रिया आहे, ज्याचा अर्थ असा आहे की सध्या दिवस 24 ते 25 तास होण्यासाठी कित्येक हजार वर्षे लागतील, कदाचित आणखी वेळ लागेल. पण एक दिवस असा येईल की मानवाचा दिवस 24 तासांचा नसून 25 तासांचा असेल. सध्या, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की चंद्राचे सध्याचे वय सुमारे 4.5 अब्ज वर्षे आहे.

चंद्र पृथ्वीपासून दूर का जात आहे?
द अटलांटिक मधील एका अहवालानुसार, शास्त्रज्ञांनी बीमिंग लेझरचा वापर तसेच विविध स्त्रोत एकत्र करून 'लूनर रिट्रीट' मोजले, ज्यावरून असे दिसून आले की, चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून हळूहळू दूर जात आहे. शास्त्रज्ञांच्या मते, इतर ग्रह चंद्राला स्वतःकडे खेचत आहेत. म्हणजेच त्या ग्रहांची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीपेक्षा जास्त आहे, म्हणूनच चंद्र दरवर्षी सुमारे 3.82 सेमी वेगाने पृथ्वीपासून दूर जात आहे.

प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे संतुलन

खगोलशास्त्रज्ञांच्या मते, चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून सुमारे 3.8 सेमीने दूर जात आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की याचे कारण अंतराळातील हैवी प्लैटनरी बॉडीज आहे. खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे संतुलन असते. सर्व ग्रह एकमेकांना आकर्षित करत आहेत. यामुळे चंद्र पृथ्वीपासून दूर जात आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की अवकाशातील एका घटनेमुळे डायनासोरची प्रजाती पृथ्वीवरून पूर्णपणे नाहीशी झाली.

 245 कोटी वर्षांपूर्वी दिवस किती तासांचा होता?
खगोलशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की 245 कोटी वर्षांपूर्वी, जेव्हा चंद्र आजच्यापेक्षा पृथ्वीच्या अगदी जवळ होता, तेव्हा एका दिवसात फक्त 16.9 तास होते. जसजसा वेळ निघून गेला आणि चंद्राचे अंतर वाढत गेले तसतसा दिवस 24 तासांचा झाला. या घटनेचा पृथ्वीवरील प्राणी, मानव, वनस्पती आणि इतर सर्व गोष्टींच्या जीवनावर कोणताही परिणाम होण्यासाठी लाखो वर्षे लागतील. 1969 मध्ये अपोलो मोहिमेदरम्यान नासाच्या खगोलशास्त्रज्ञांनी चंद्राच्या पृष्ठभागावर परावर्तित पॅनेल स्थापित केले. यानंतर शास्त्रज्ञांना आता हे लक्षात आले आहे की दरवर्षी चंद्र एका विशिष्ट वेगाने पृथ्वीपासून दूर जात आहे.

पृथ्वीवरील जीवनात चंद्राची मोठी भूमिका
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, पृथ्वीवरील जीवनासाठी चंद्राची भूमिका महत्त्वाची आहे. पृथ्वीवरील हवामान स्थिर ठेवण्याचे हे देखील कारण आहे. चंद्रामुळेच समुद्रात भरती-ओहोटी निर्माण होतात. लाखो आणि अब्जावधी वर्षांपासून, चंद्राने पृथ्वीच्या जीवनाची लय कायम ठेवली आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या म्हणण्यानुसार, अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळाच्या आकाराची एखादी वस्तू पृथ्वीवर आदळली असावी, ज्यामुळे चंद्राची निर्मिती झाली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Mutual Divorce :  परस्पर सहमतीने घटस्फोट म्हणजे काय? भारतात याबाबत काय कायदा आहे ते जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्यMajha Vitthal Majhi Wari : तुकोबांच्या पालखीचा काटेवाडीतील डोळ्यांची पारणं फेडणारा रिंगण सोहळाABP Majha Marathi News Headlines 10pm TOP Headlines 10pm 03 July 2024ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09PM 07 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget