एक्स्प्लोर

उत्तर कर्नाटकावर चर्चा होत मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी; काँग्रेस आमदाराने अकलेचे तारे तोडले

अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा अशी मागणी करत असतील तर आपण देखील मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केली पाहिजे असे वक्तव्य करून आपल्या अकलेच्या तारे तोडले.

 बेळगाव : बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आज बुधवारी उत्तर कर्नाटकावर चर्चा होत असताना अथणी येथील काँग्रेसच्या आमदारांनी मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी करून आपल्या अकलेचे तारे तोडले.  बेळगाव येथील सुवर्ण विधानसभेत येथे कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाच्या उत्तरार्धात उत्तर कर्नाटकातील समस्या आणि विकासावर चर्चा सुरू आहे. त्यानुसार आज सभागृहामध्ये चर्चेला प्रारंभ झाल्यानंतर अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेते बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा अशी मागणी करत असतील तर आपण देखील मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केली पाहिजे असे वक्तव्य करून आपल्या अकलेच्या तारे तोडले.

मुंबई देखील केंद्रशासित करावी अशी मागणी आपण केली पाहिजे

आमदार सवदी म्हणाले परवा महाराष्ट्रातील बुद्धिभ्रष्ट झालेल्या एका नेत्याने बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा असे वक्तव्य केले. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावून प्रश्न विचारला असता संबंधित नेत्याची मती भ्रष्ट झाल्याचे मी स्पष्टपणे सांगितले. या पद्धतीने जर कर्नाटकाचा अविभाज्य अंग असलेला बेळगाव सीमाभाग केंद्रशासित करायचा असेल तर मुंबई देखील केंद्रशासित करावी अशी मागणी आपण केली पाहिजे. कारण आमचे पूर्व मुंबईत वास्तव्यास होते. त्यामुळे आमचा मुंबईवर अधिकार आहे असे आपण म्हणू शकतो. कारण पूर्वी बेळगावसह अन्य सहा जिल्हे मुंबई प्रांताचा भाग असताना आमचे कर्नाटकातील लोक मुंबईला जात होते. त्या ठिकाणी वास्तव्यास होते आणि ही बाब लक्षात घेता आमचा मुंबईवर हक्क आहे. त्यामुळे प्रथम मुंबई केंद्रशासित केली जावी आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, असे वक्तव्य करून आमदार लक्ष्मण सवदी यांनी आज स्वतःच्याच मती भ्रष्टतेची जणू प्रचिती दिली. एवढे बोलून न थांबता आमदार सवदी यांनी महाराष्ट्राला बेळगाव हवे असेल तर ते त्यांना द्या आणि त्या बदल्यात आमच्या पूर्वजांनी राज्य केलेले मुंबई कर्नाटकाला घ्या असा अजब सल्लाही दिला. 

दरम्यान, बेळगाव-महाराष्ट्रातील नेते बेळगावला केंद्रशासित करण्याची मागणी सातत्याने करत असतात. या उलट बेळगाव सीमाभागाचा मुंबईवर हक्क आहे. त्यामुळे मुंबईला केंद्रशासित करण्यात यावे, असा प्रस्ताव कर्नाटक शासनाने केंद्र सरकारकडे पाठवावा अशा अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी आज विधानसभेत केलेल्या अजब मागणीची पडसाद नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.

आपल्या भागात अलमट्टी धरणातून पाणी सिंचन झाले पाहिजे

सभागृहात उत्तर कर्नाटकावर झालेल्या चर्चेप्रसंगी आमदार बसवराज पाटील -यत्नाळ यांनी अलमट्टी धरणाच्या पाणी सिंचनाचा मुद्दा उपस्थित केला. आपल्या भागात अलमट्टी धरणातून पाणी सिंचन झाले पाहिजे तसे झाले तरच आमचा जगू शेतकरी जगू शकेल, असे नमूद केले. त्याचप्रमाणे रोजगार निर्मिती, शिक्षण आणि परिवहन याबाबतीतील समस्या सोडवाव्यात अशी मागणी त्यांनी केली. बेळगावला कोट्यावधी रुपये खर्च करून सुवर्ण विधानसौधची इमारत उभारण्यात आली असली तरी अधिवेशनाचा काळ वगळता वर्षभर ही इमारत ओस मोकळी पडून असते. अधिवेशनासाठी दरवर्षी जवळपास 25 कोटी रुपये खर्च केले जातात तितकाच खर्च सुवर्णसौधच्या देखभालीसाठी होत असतो. हे लक्षात घेऊन या ठिकाणी राज्य पातळीवरील सरकारी कार्यालय स्थापन केली जावीत असे मग काही आमदारांनी व्यक्त केले. बेळगाव जिल्हास्तरीय कार्यालय या ठिकाणी स्थलांतरित करून काय फायदा होणार? असा सवालही त्या आमदारांनी केला. याखेरीज बेळगाव शहरातील उदयोन्मुख होतकरू खेळाडूंवर राज्यस्तरावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जावी त्यांच्यासाठी आधुनिक क्रीडा सुविधा आणि क्रीडांगण उपलब्ध करून दिली जावी अशी मागणी देखील काही आमदारांनी केली. कल्याण कर्नाटकासाठी जसे प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे तसेच बेळगावचा अंतर्भाव असलेल्या कित्तूर कर्नाटकासाठी स्वतंत्र प्राधिकरण नेमून दरवर्षी किमान 1000 कोटी रुपयांचे अनुदान दिले जावे, अशी मागणी बहुतांश आमदारांनी केली.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : मंत्र्यांना अजूनही खात्यांचे वाटप अद्याप झालेलं नाही, निवडणूक आयोगाने दिलेल्या जनादेशाचा हा अपमान; आदित्य  ठाकरेंचा इंग्रजीतून टोला
मंत्र्यांना अजूनही खात्यांचे वाटप अद्याप झालेलं नाही, निवडणूक आयोगाने दिलेल्या जनादेशाचा हा अपमान; आदित्य ठाकरेंचा इंग्रजीतून टोला
Elephanta Boat Accident : दम्याच्या उपचारासाठी नाशिकचं आहेर कुटुंब मुंबईत, समुद्र सफारीचा आनंद लुटण्यासाठी नीलकमलमध्ये प्रवास केला अन्...
दम्याच्या उपचारासाठी नाशिकचं आहेर कुटुंब मुंबईत, समुद्र सफारीचा आनंद लुटण्यासाठी नीलकमलमध्ये प्रवास केला अन्...
Manipur Starlink Satellite Device : मणिपूरमध्ये घुसखोरांकडे मस्कचे कायदेशीर परवानगी नसतानाही स्टारलिंक डिव्हाइस सापडले; भारत का आहे तणावात?
मणिपूरमध्ये घुसखोरांकडे मस्कचे कायदेशीर परवानगी नसतानाही स्टारलिंक डिव्हाइस सापडले; भारत का आहे तणावात?
Rohit Pawar : वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचे, म्हणूनच...; बीड प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक, CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी!
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचे, म्हणूनच...; बीड प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक, CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मालक तुम्ही उद्धव ठाकरे यांना फोन का केला  - संजय राऊतSuresh Dhas BJP : देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडतोय - सुरेश धसSandeep Kshirsagar  : Walmik Karad ला अटक करा, Beed प्रकरणी संदीप क्षीरसागरांनी सभागृह हलवलंABP Majha Headlines :  10 AM : 19 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : मंत्र्यांना अजूनही खात्यांचे वाटप अद्याप झालेलं नाही, निवडणूक आयोगाने दिलेल्या जनादेशाचा हा अपमान; आदित्य  ठाकरेंचा इंग्रजीतून टोला
मंत्र्यांना अजूनही खात्यांचे वाटप अद्याप झालेलं नाही, निवडणूक आयोगाने दिलेल्या जनादेशाचा हा अपमान; आदित्य ठाकरेंचा इंग्रजीतून टोला
Elephanta Boat Accident : दम्याच्या उपचारासाठी नाशिकचं आहेर कुटुंब मुंबईत, समुद्र सफारीचा आनंद लुटण्यासाठी नीलकमलमध्ये प्रवास केला अन्...
दम्याच्या उपचारासाठी नाशिकचं आहेर कुटुंब मुंबईत, समुद्र सफारीचा आनंद लुटण्यासाठी नीलकमलमध्ये प्रवास केला अन्...
Manipur Starlink Satellite Device : मणिपूरमध्ये घुसखोरांकडे मस्कचे कायदेशीर परवानगी नसतानाही स्टारलिंक डिव्हाइस सापडले; भारत का आहे तणावात?
मणिपूरमध्ये घुसखोरांकडे मस्कचे कायदेशीर परवानगी नसतानाही स्टारलिंक डिव्हाइस सापडले; भारत का आहे तणावात?
Rohit Pawar : वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचे, म्हणूनच...; बीड प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक, CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी!
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचे, म्हणूनच...; बीड प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक, CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी!
R. Ashwin : न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील पराभव जिव्हारी, आर. अश्विन ऑस्ट्रेलियाला जायला तयार नव्हता? रिपोर्टमध्ये नवा दावा
अश्विन बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जायला तयार नव्हता? नेमकं कारण काय? नव्या रिपोर्टमध्ये दावा
Nagpur RSS : अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
मोठी बातमी... SME आयपीओसाठी कठोर नियम लागू, सेबीची नवी नियमावली, बैठकीत मोठे निर्णय
SME आयपीओत पैसे लावणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सेबीनं उचलली कठोर पावलं,नवे नियम लागू
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
Embed widget