R. Ashwin : न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील पराभव जिव्हारी, आर. अश्विन ऑस्ट्रेलियाला जायला तयार नव्हता? रिपोर्टमध्ये नवा दावा
Ravichandran Ashwin : रविचंद्रन अश्विन यानं गाबा कसोटीनंतर निवृत्ती जाहीर केली. अश्विननं बॉर्डर गावसकर ट्राफीत तीन पैकी एक कसोटी खेळली.
ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर कसोटी मालिका सुरु असताना आर. अश्विननं निवृत्तीची घोषणा केली. गाबा कसोटी ड्रॉ झाल्यानंतर अश्विननं रोहित शर्मासोबत पत्रकार परिषद घेत निवृत्तीची घोषणा केली. अश्विननं तिसरी कसोटी संपताच हा निर्णय घेतला. पुढील दोन कसोटी बाकी असताना त्याच्या या निर्णयानं सर्वांना आश्चर्यचकित केलं. कदाचित आर. अश्विनला वाटलं असावं की पुढील दोन कसोटीमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी असावी.
एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की आर अश्विन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यास तयार नव्हता. न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेत भारताचा दारुन पराभव झाला होता. भारताला तीन कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाहोता. तेव्हापासूनच अश्विनच्या मनात निवृत्तीचा विचार सुरु होता, त्या दरम्यान प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याच्या खात्रीसह तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आला होता.
पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पाच सामन्यांच्या मालिकेत खेळण्यास इच्छुक नव्हता. आस्ट्रेलियाचा दौरा करण्याची त्याची इच्छा नव्हती. आर . अश्विननं 106 कसोटीमध्ये 534 विकेट घेत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची खात्री होईपर्यंत अश्विन ऑस्ट्रेलियाला येण्यास तयार नव्हता अशी माहिती पीटीआयच्या रिपोर्टमध्ये दिलं आहे. ऑस्ट्रेलियातील पहिल्या तीन कसोटी पैकी केवळ एक कसोटी खेळला होता.
रिपोर्टनुसार असं मानलं जातंय की, भारतातील न्यूझीलंड विरुद्धची मालिका गमावल्यापासून अश्विनच्या मनात निवृत्तीचा विचार होता. जो पर्यंत प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची खात्री मिळत नाही तोपर्यंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार नाही असं संघ व्यवस्थापनाला अश्विननं कळवलं होतं, असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
पर्थ कसोटीत जसप्रीत बुमराहनं वॉशिंग्टन सुंदरला स्थान दिलं होतं. दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा कॅप्टन झाल्यानंतर त्यानं आर. अश्विनला संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र, त्या कसोटीत अश्विनला चांगली कामगिरी करता आली नव्हती. तिसऱ्या कसोटीत रविंद्र जडेजाला स्थान देणयात आलं होतं. जडेजानं चांगली फलंदाजी केल्यानं संघात बदल होण्याची शक्यता कमी होती.
रोहित शर्मानं गाबा कसोटी ड्रॉ झाल्यानंतर मेलबर्न आणि सिडनी कसोटीत संघात बदल होण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं. त्या पार्श्वभूमीवर आर. अश्विननं देखील निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
इतर बातम्या :