एक्स्प्लोर

मोठी बातमी... SME आयपीओसाठी कठोर नियम लागू, सेबीची नवी नियमावली, बैठकीत मोठे निर्णय

SEBI on SME IPO : शेअर बाजारात आयपीओच्या लॉट खरेदीतून गुंतवणूक करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. गुंतवणूकदार अडचणती येऊ नयेत म्हणून सेबीनं कठोर पावलं उचलली आहेत. 

मुंबई : एखाद्या कंपनीला शेअर बाजारात म्हणजेच बीएसई आणि एनएसईवर लिस्ट व्हायचं असल्यास किंवा भांडवली बाजारातून पैशांची उभारणी करायची असल्यास आयपीओचा पर्याय निवडला जातो. भारतीय शेअर बाजारात मेनबोर्ड आयपीओ आणि एसएमई आयपीओ  अशा दोन प्रकाराच्या आयपीओचे लॉट गुंतवणूकदारांना खरेदी करता येतात. गेल्या काही दिवसांमध्ये स्मॉल अँड मिडीयम एंटरप्रायझेस च्या आयपीओच्या लॉट खरेदीसाठी गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रमाणात पैसे लावल्याचं समोर आलं होतं. एसएमई आयपीओतून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील मिळाला होता. आता सेबीनं एसएमई आयपीओ संदर्भातील नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रामुख्यानं ज्या कंपनीला एसएमई आयपीओ आणायचा आहे त्या कंपनीला गेल्या तीन वर्षांपैकी दोन वर्षांमध्ये किमान 1 कोटी रुपयांचा नफा झालेला असणं आवश्यक आहे. एसएमई आयपीओत ऑफर फॉर सेल 20 टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही. मिनिमम प्रमोटर काँट्रिब्यूशनंचा लॉक इन कालावधी 1 वर्ष असेल. प्रमोटर्सकडे एमपीसीच्या होल्डिंगपैकी 50 टक्के होल्डिंग एका वर्षात रिलीज करता येऊ शकतं. दुसऱ्या वर्षानंतर 50 टक्के  होल्डिंग रिलीज करता येईल.   

सेबीनं बुधवारी झालेल्या बैठकीत 19 मोठे निर्णय घेतले. ज्यामध्ये एसएमई आयपीओ, आरईआयटी, आयएनवीआयटी आणि यूपीएसआयच्या लिस्टींगसाठीचे नियम कडक केले आहेत.  सेबीनं पास्ट रिस्क अँड रिटर्न वेरिफिकेशन एजन्सीच्या स्थापनेला देखील मंजुरी दिली.

एसएमई आयपीओद्वारे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाल्याचं पाहायला मिळतं.  पर्पल युनायटेड सेल्स या एसएमई आयपीओनं गुंतवणूकदारांना लिस्टिंगवेळी 57 टक्के परतावा मिळाला. जंगल कॅम्प्स, टॉस द कॉइन, धनलक्ष्मी क्रॉप सायन्स, एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चर्स, ग्रीन इन्फ्रावर्ल्ड या कंपन्यांच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना 90 टक्के परतावा मिळाला.   

दरम्यान, भारतीय शेअर बाजारात सध्या न्यू मलायम स्टील, आयडेंटिकल ब्रेन्स स्टुडिओज, एनएसीडीएसी इन्फ्रास्ट्रक्चर हे एसएमई आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले आहेत. तर, मेन बोर्ड आयपीओमध्ये ट्रान्सरेल लायटिंग, ममता मशिनरी, दाम कॅपिटल, सनातन टेक्स्टाइल, कॉनकॉर्ड इनवायरो सिस्टीम्स, वेंटीव हॉस्पिटलिटी, सेनोरेस  फार्मा, कॅरारो इंडिया या कंपन्यांचे मेनबोर्ड आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले आहेत. 

इतर बातम्या : 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.) 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur RSS : अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
EPFO अन् ESIC सदस्यांना ATM मधून पीएफचे पैसे कधीपासून काढता येणार? नवी अपडेट समोर 
EPFO मधून पीएफचे पैसे एटीएममधून कधीपासून काढता येणार? पीएफ काढण्याच्या नियमांबाबत मोठी अपडेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gateway Of India : बोटीतील प्रवाशांना सेफ्टी जॅकेट घालणं अनिवार्य, बोट दुर्घटनेनंतर विशेष काळजीSudhir Mungantiwar Nagpur :  देशाच्या विकासासाठीचे उर्जाकेंद्र म्हणजे रेशीमबागRaju Karemore at RSS Nagpur : अजित पवारांचा पहिला आमदार संघ मुख्यालयात;राजू कारेमोरे म्हणाले...Nagpur RSS : आरएसएस रेशीमबागेत एकनाथ शिंदे दाखल; भाजप, शिवसेनेचे आमदार उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur RSS : अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
EPFO अन् ESIC सदस्यांना ATM मधून पीएफचे पैसे कधीपासून काढता येणार? नवी अपडेट समोर 
EPFO मधून पीएफचे पैसे एटीएममधून कधीपासून काढता येणार? पीएफ काढण्याच्या नियमांबाबत मोठी अपडेट
अकोला पश्चिमच्या काँग्रेस आमदाराच्या अडचणी वाढणार? दाऊद, हसीना पारकरशी संबंध असल्याच्या महिलेच्या दाव्यावरुन तक्रार दाखल
दाऊद, हसीना पारकरशी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचे संबंध? पोलिसांत तक्रार दाखल
Jitendra Awhad : कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक
कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, आका कोण तुम्हाला माहिती नाही : जितेंद्र आव्हाड
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Embed widget