(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : जरा यांनाही कुणीतरी विचारा... झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा इमोशनल व्हिडीओ व्हायरल, भूक लागल्यावर गाडी थांबवून रस्त्यावरच जेवण
Delivery Boy Eating In Hurry : बाईक एका साईटला लावून उभं राहून घाईघाईत जेवतानाचा डिलिव्हरी बॉयचा एक इमोशनल व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Delivery Boy Viral Video : तुम्हीही कधीतरी ऑनलाईन फूड ऑर्डर केलंच असेल. ही फूड डिलिव्हरी (Food Delivery) करणारे डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) अनेकदा चर्चेत येतात. दिवसभर उन्हा-तान्हात अगदी भरपावसातही हे डिलिव्हरी बॉय मेहनत करताना दिसतात. पण इतरांपर्यंत वेळेत जेवण पोहोचवणाऱ्या या डिलिव्हरी बॉयला जेव्हा भूक लागते, तेव्हा तो नेमकं काय करतो, याकडे तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? डिलिव्हरी बॉयला निवांत जेवायलाही वेळ मिळत नाही. डिलिव्हरी बॉयचा असाच एक इमोशनल व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
दोन वेळेच्या जेवणासाठी डिलिव्हरी बॉयची मेहनत
सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून या डिलिव्हरी बॉयचा संघर्ष दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला बाऊन लावून त्याच्या शेजारी उभं राहून घाईघाईनं जेवण करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फूड डिलिव्हरी करताना मधेच भूक लागल्यावर हा डिलिव्हरी बॉय उभा राहूनच गाडीवर जेवताना दिसत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ :
इस मौसम में इनका भी ख्याल रखें. pic.twitter.com/Rf2kHs4srk
— Awanish Sharan 🇮🇳 (@AwanishSharan) June 20, 2023
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
IAS अवनीश शरण (@AwanishSharan) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या 20 सेकंदांच्या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन देत लिहिलं आहे की, ''इस मौसम में इनका ख्याल रखें।'' या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की फूड डिलिव्हरी करणारा व्यक्ती बाईकवर जेवताना दिसत आहे. डिलिव्हरी बॉय दुचाकी शेजारी उभा राहून एका बाजूला एक टक बघत प्लास्टिकच्या पिशवीतून काहीतरी खात आहे. यावेळी तो आजूबाजूलाही नजर फिरवतो. 20 जूनला पोस्ट केलेल्या या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
नेटकऱ्यांकडून डिलिव्हरी बॉयचं कौतुक
डिलिव्हरी बॉयची मेहनत पाहून सोशल मीडियावर अनेक जण त्याचं कौतुक करत आहेत, तसेल त्याला शांतपणे दोन घास खायला मिळत नसल्यामुळे अनेक जण हळहळ व्यक्त करत आहेत. अनेक नेटकरी या इमोशनल व्हिडीओच्या खाली कमेंट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ अनेकांनी रिशेअरही केला आहे. अशा गरजू लोकांनी नक्की मदत करा, असं एका यूजरने म्हटलं आहे.
संबंधित इतर बातम्या :