Viral Video : 'हम होंगे कामयाब...', स्विगी डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल, मेहनत पाहून नेटकरीही भारावले
Swiggy Delivery Boy Viral Video : भर पावसातील स्विगी डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोटापाण्यासाठी या डिलिव्हरी बॉयची मेहनत पाहून नेटकरी भावूक झाले आहेत.
Delivery Boy Viral Video : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्या छोट्या-मोठ्या अडचणी असतात. काही जण या अडचणींचा ठोसपणे सामना करतात, तर काही जण या परिस्थितीपासून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही अनेक वेळा काही जणांना परिस्थिती आणि नशीबाला दोष देताना पाहिलं असेल. हे लोक नशीबावर खापर फोडत मेहनत करण्याकडे पाठ फिरवतात. पण काही जण असे असतात, जे मेहनत करून परिस्थितीवर मात करण्याचा जिद्दीने प्रयत्न करतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक डिलिव्हरी बॉय भर पावसात सायकलवरून फूड डिलिव्हरी करताना दिसत आहे. प्रत्येकाला आपलं दु:ख किंवा आपली अडचण मोठी वाटते. काहीजण याची तक्रार करतात. पण काही जण प्रामाणिकपणे दोन वेळेच्या जेवणासाठी मेहनत करताना दिसतात. स्विगी बॉयच्या या व्हिडीओ त्याच्या जिद्दीचा प्रत्यय येतो.
सहूलियत की कमी में भी खुश है कोई
— उम्दा_पंक्तियां (@umda_panktiyan) August 1, 2022
और समृद्ध को बहाने से ही फुर्सत नहीं। pic.twitter.com/4whWwa8zaz
डिलिव्हरी बॉयला सलाम!
स्विगी डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसात सायकलवरून फूड डिलिव्हरी करताना दिसत आहे. डिलिव्हरीचा हा व्हिडीओ पाहून अनेक जण प्रेरित झाले आहेत. नेटकरी डिलिव्हरीची जिद्द आणि प्रामाणिकपणाला सलाम करत त्याचं कौतुक करत आहेत.
नेटकऱ्यांनी केलं डिलिव्हरी बॉयचं कौतुक
मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर लक्ष्य गाठता येते, यावर या स्विगी बॉयचा विश्वास असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ @umda_panktiyan नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेक युजर्सनी कमेंट करत स्विगी डिलिव्हरी बॉयचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
संबंधित इतर बातम्या