Trending Video : पाणीपुरी तर सगळ्यांनाच आवडते; पण गाईला कधी पाणीपुरी खाताना पाहिलं आहे का? पाहा हा व्हायरल व्हिडीओ
Trending Cow Video : आंबट गोड चवीची चटकदार पाणीपुरी खायला प्रत्येकालाच आवडते. मात्र, तुम्ही कधी प्राण्यांना पाणीपुरी खाताना पाहिलं आहे का?
Trending Cow Video : स्ट्रीट फूड खाणं प्रत्येकालाच आवडते. त्यामध्येच पाणीपुरी (Pani Puri) म्हटलं की अनेकांचा जीव की प्राण. आंबट गोड चवीची चटकदार पाणीपुरी प्रत्येकजण अगदी आवडीने खातो. तुम्ही अनेकदा दुकानांत, स्टॉलवर, मॉलमध्ये पाणीपुरी खाणाऱ्यांची गर्दी पाहिली असेल. पण, या गर्दीत तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला पाणीपुरी खाताना पाहिलं आहे का? नसेल तर हा व्हिडीओ नक्की पाहा.
पाहा व्हिडीओ :
मां-बेटी साथ हों और गोलगप्पे की दुकान हो..
— Sanjay Kumar, Dy. Collector (@dc_sanjay_jas) September 25, 2022
फिर कहना ही क्या 💕#MotherDaughter #Respectfully #beautiful pic.twitter.com/KnLjiR1lfs
ट्विटरवर शेअर केलेल्या या रंजक व्हिडीओमध्ये तुम्हाला एक गाय आणि तिचे वासरू पाणीपुरी खाताना दिसत आहे. हा व्हिडीओ रेड हिल कॉन्व्हेंट स्कूल, लखनौजवळ मोबाईलमध्ये कैद करण्यात आला आहे. या व्हिडीओला यूजर्सकडून खूप पसंतीही मिळतेय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पाणीपुरी खाताना दिसली गाय
या व्हिडीओमध्ये पाणीपुरी विक्रेता आपल्या हाताने गाईला आणि तिच्या वासराला पाणीपुरी खाऊ घालताना दिसत आहे. आणि गायसुद्धा अगदी आनंदाने पाणीपुरी खाण्यात व्यस्त आहे. हे दृष्य डोळ्यांना अगदी अचंबित करणारं आहे.
झारखंडचे जिल्हाधिकारी संजय कुमार यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिले आहे की, "जर आई आणि मुलगी एकत्र असतील आणि पाणीपुरीचं दुकान असेल, तर पुढे काय म्हणावं?" या व्हिडीओला 8 हजारांहून अधिक यूजर्सनी लाईक केले आहे. तर, 1 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला रिट्विट केले आहे.
महत्वाच्या बातम्या :