Viral Video : स्ट्रीट फूड आवडीनं खाताय? पाहा 'हा' धक्कादायक व्हिडीओ, मिठाईवाला चक्क झाऱ्यानं खाजवतोय पाठ!
Viral Video : सोशल मीडियावर एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती झाऱ्याने पाठ खाजवताना दिसत आहे.
Street Food Vender Viral Video : स्ट्रीट फूड (Street Food) म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटणं स्वाभाविक आहे. अनेक जणांना स्ट्रीट फूट खाण्याची सवय लागते. स्ट्रीट फूड दिसायला जरी चमचमीत असलं तरी अनेक वेळा आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो. असं असलं तरीही आपण वडापाव, समोसा, जिलेबी, पाणी पुरी अशा पदार्थांपासून स्वत:ला दूर ठेवू शकतं नाही. अनेक वेळा असे चमचमीत स्ट्रीट फूडचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात. हा व्हिडीओ पाहून स्वत:ला या पदार्थांचा आस्वाद घेण्यापासून रोखणं कठीण होतं. पण सध्या व्हायरल झालेल्या एक व्हिडीओ पाहून तुम्ही स्ट्रीट फूटपासून स्वत:ला दूर राहण्याचाच निर्णय घ्यालं.
स्ट्रीट फूडसंदर्भातील काही व्हिडीओ अलिकडच्या काळात व्हायरल झाले आहेत. यामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत गांभीर्य नसल्याचं दिसून आलं. अनेक स्ट्रीट फूडवर साफसफाईची काळजी घेतली नसल्याचं दिसलं. याला काही अपवाद असले, तरी प्रत्येक स्ट्रीट फूड स्टॉलवर ही काळजी घेतली जातेच असं नाही. याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. हा व्हायरल व्हिडीओ एका स्टॉलवरचा आहे. यामध्ये एक मिठाईवाला स्वयंपाक बनवण्यासाठी वापरण्यात येणारं झाऱ्यानं पाठ खाजवताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओ येथे पाहा
View this post on Instagram
मिठाईवाला झाऱ्यानं खाजवतोय पाठ
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या झाऱ्याने एक व्यक्ती पाठ खाजवताना दिसत आहे. झाऱ्याचा वापर वडापाव, समोसा, जलेबी किंवा मोमो तयार करण्यासाठी वापरला जातो. मात्र या स्टॉलवर हा व्यक्ती झाऱ्याने पाठ खाजवताना दिसत आहे. हे पाहून युजर्सची झोप उडाली आहे. युजर्स आता सर्वजण स्ट्रीट फूड खाणे टाळण्याचा सल्ला देत आहेत. आजूबाजूला अनेक जण असतानाही हा व्यक्ती झाऱ्याने चक्क पाठ खाजवत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सनी व्यक्त केला संताप
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अब्दुल रहमान नावाच्या व्यक्तीने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ही बातमी लिहेपर्यंत सोशल मीडियावर या व्हिडीओला 86 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर हजाराहून अधिक युजर्सनी याला लाईक केलं आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत लोकांना स्ट्रीट फूड खाताना काळजी घेण्याचा इशारा दिला आहे.