(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharat Jodo Yatra: 'भारत जोडो यात्रे' दरम्यान एका चिमुकलीसोबत गप्पा मारताना राहुल गांधींचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'खूप क्यूट'!
Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांचा नांदेडमध्ये राहणाऱ्या चिमुकली सोबत गप्पा मारतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या (Congress) 'भारत जोडो यात्रे'चा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आज पाचवा दिवस आहे. काल संध्याकाळी राहुल गांधी (Rahul Gandhi) नांदेडमध्ये सभेला संबोधित केले. नांदेडच्या लोहा भागातील कापशी चौकातून राहुल गांधी यांनी काल सकाळी 6 वाजता पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी राहुल गांधींनी अनेक लोकांशी हस्तांदोलन केले. तर काहींशी त्यांनी गप्पाही मारल्या. अशातच राहुल गांधी यांचा नांदेडमध्ये राहणाऱ्या चिमुकली सोबत गप्पा मारतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
This video pic.twitter.com/P2wsueiLCz
— Srinivas BV (@srinivasiyc) November 10, 2022
चिमुकलीसोबत केलेले राहुल गांधींचे संभाषण व्हायरल
भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेडमध्ये असताना एका चिमुकलीसोबत केलेले संभाषण सध्या सोशल मीडीयावर चांगलेच व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी तिला भविष्यात काय व्हायचंय? तसेच तिच्याशी संबंधित अनेक प्रश्नांची विचारणा करतात? त्यावेळी या मुलीने दिलेली उत्तरे नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे. पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही वेळातच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाला आहे. या व्हिडीओला लाईक्स आणि प्रतिक्रिया येत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काय आहे?
राहुल गांधींनी एका चिमुकलीला विचारले, तुला मोठं होऊन काय व्हायचंय?
तेव्हा मुलगी म्हणते, - मला पोलीसमध्ये भरती व्हायचंय.
राहुल गांधी - पण सगळेच पोलीस मध्ये भरती झाले तर अडचण होईल
चिमुकली- ते सगळे चोरांना पकडतील, आणि एकही चोर उरणार नाही
राहुल गांधी - तुझ्या हातात हे चॉकलेट कसले?
चिमुकली - मी खात नाही, पण कोणीतरी माझ्या हातात दिले
राहुल गांधी - मग तुझ्या तोंडात काय आहे?
चिमुकली - कोणी तरी मला भरवले चॉकलेट, मी नाही खात
राहुल गांधी - तुला माहित आहे का? समोर काय चाललंय ते? (भारत जोडो यात्रेबद्दल विचारतात)
चिमुकली - तुमचा कार्यक्रम सुरू आहे ना..!
राहुल गांधी - तुझे आईवडिल काय करतात?
चिमुकली - ते तुमच्या कार्यक्रमात येतात
राहुल गांधी - तुला किती भावंड आहेत?
चिमुकली - दोन भाऊ आहे. पण आई-बाबा मलाच ओरडतात.
राहुल गांधींचा नोटाबंदीवरून मोदींवर आरोप
नांदेड शहर, देगलूर, अर्धापूर भागातून ही यात्रा शुक्रवारी हिंगोली येथे पोहोचणार आहे. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदी करून 'आर्थिक सुनामी' आणल्याचा आरोपही केला.
भारत जोडो यात्रा आज हिंगोलीत, आदित्य ठाकरे सामिल होणार
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील पाचवा दिवस असून ही यात्रा हिंगोलीत दाखल होणार आहे. दुपारी 3 वाजता चोरंबा फाटा येथून ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करेल या ठिकाणी भारत जोडो यात्रेचे स्वागत केले जाईल. जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक नेतेमंडळी राहुल गांधी यांचे स्वागत करणार आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज दुपारी चार वाजता भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Viral Video : 'फॉरेनची पाटलीण' चक्क शेतात करतेय कांदा पेरणी! सासू झाली खूश, नेटकरी आश्चर्यचकीत!