Viral Video : रिक्षाचालकाने थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवरच नेली रिक्षा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Auto on Railway Platform : रेल्वे प्लॅटफॉर्मवर रिक्षा नेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ मुंबईच्या कुर्ला स्थानकावरील आहे.
Kurla Railway Station : एका रिक्षाचालकाने (Auto Rickshaw) रस्त्याऐवजी थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर (Railway Platform) रिक्षा नेल्याची विचित्र घटना मुंबईत घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. एका रिक्षाचालकाने रिक्षा थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवरच नेली. मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकावर (Kurla Railway Station) ही घटना घडली आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर रिक्षा आल्याच पाहून तिथे उपस्थित प्रवासीही हैराण झाले. चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवरच रिक्षा आल्याने आधी प्रवासी गोंधळले. त्यानंतर प्रवाशांनी आरडाओरड करत रिक्षाचालकाला रिक्षा प्लॅटफॉर्मवरून बाहेर काढायला लावली. ही सर्व विचित्र घटना घडताना उपस्थितांपैकी काही जणांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रीत केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रिक्षाचालकाने थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवरचं आणली रिक्षा
रस्त्यावर रिक्षा चालवताना स्टंट करतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण रेल्वे प्लॅटफॉर्मवर रिक्षा आल्याचं पाहिलंय का? हो अशी विचित्र घटना घडली आहे मुंबईत. इथे एका रिक्षाचालकाने चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवर रिक्षा आणली. मुंबईतील कुर्ला स्थानकात ही विचित्र घटना घडली आहे. कुर्ला रेल्वे स्थानकावर रिक्षाचालकाने थेट रिक्षा रेल्वे प्लॅटफॉर्मवरच नेली. या मागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हा व्हिडीओ 12 ऑक्टोबरचा असल्याचं समोर येत आहे. दरम्यान रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ : कुर्ला रेल्वेस्थानकाच्या आत एक रिक्षा गेल्याचा व्हिडीओ व्हायरल
रेल्वे प्लॅटफॉर्मवर रिक्षा आणल्याचा व्हिडीओ व्हायरल
12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. पहाटे 1 वाजेच्या सुमारास पश्चिम दिशेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर अचानक एक रिक्षा घुसली. रेल्वे प्लॅटफॉर्मवर रिक्षा आल्याचं पाहून प्रवासी चांगलेच गोंधळले. त्यानंतर उपस्थिती प्रवाशांनी आरओरडा करताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी प्लॅटफॉर्मवरून रिक्षा बाहेर काढली आणि रिक्षाचालकाला अटक केली. रिक्षावाल्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली मात्र या घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर रिक्षा आल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
महत्त्वाच्या इतर बातम्या