Abdul Kalam Video Viral : जीवनात यशस्वी होण्यासाठी मुलीने अब्दुल कलामांकडे मागितल्या होत्या टिप्स, मिसाईल मॅनने सांगितला 'हा' मंत्र
Abdul Kalam Motivational Video:भारताचे 11 वे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Abdul Kalam Motivational Video: अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम, ज्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते, ते भारताचे 11 वे राष्ट्रपती होते. ते भारताचे माजी राष्ट्रपती, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर म्हणून ओळखले जात होते. अब्दुल कलाम मुलांमध्ये खूप लोकप्रिय होते.
अब्दुल कलाम यांचा खास व्हिडीओ व्हायरल
अब्दुल कलाम यांचे हजारो व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील, पण सध्या त्यांचा एक खास व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका मुलीने अब्दुल कलाम यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही टिप्स मागितल्या आहेत. मिसाईल मॅनने मुलीला एक मंत्र सांगितला, जो तुम्हालाही माहित असावा. सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी कलाम यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी नवीन पिढीला काय टिप्स द्याल, असे विचारताना दिसत आहे. अब्दुल कलाम त्या मुलीला 4 गोष्टी सांगतात.
सपने वो नहीँ जो हम सोते हुये देखते है,
— उम्दा_पंक्तियां (@umda_panktiyan) August 2, 2022
सपने वो है जो हमे सोने नहीँ देते...!!!
~ एपीजे अब्दुल कलाम pic.twitter.com/TfPJjK4gop
या चार गोष्टी लक्षात ठेवा
सर्वप्रथम अब्दुल कलाम म्हणतात की, तुमच्या जीवनात एखादा महान उद्देश असला पाहिजे. यानंतर कलाम म्हणतात, सतत ज्ञान मिळवा. कलाम तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगतात, 'तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.' कलाम शेवटी म्हणतात, तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी ठाम असायला हवं.
अब्दुल कलाम यांचा मंत्र
जीवनात यशस्वी होण्यासाठी अब्दुल कलाम यांनी हा मंत्र दिला आहे, ज्याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @umda_panktiyan नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याला खूप पसंती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
